अनाथाश्रमात सोडायला आलेल्या नवजात बालिकेच्या प्रकरणाची वेगळीच स्टोरी
बुलडाणा /. नवप्रहार डेस्क
लोणार जिल्ह्यातून आलेल्या एका जोडप्याने अनाथाश्रमात येऊन त्यांच्या कडे असलेले नवजात बाळ एका वेडसर बाईकडे होते. ती बाळाचे संगोपन कसे करेल ? हा विचार आम्हाला पडला म्हणून आम्ही हे बाळ आश्रमात देण्याचा विचार केला असे त्यांनी आश्रमाच्या व्यवस्थापकाला सांगितले. त्यावर त्याने सबंधित ठाण्यात जाऊन याबाबत माहिती देण्याचे त्यांना सांगितले. ते जोडपे बाळाला घेऊन पोलीस ठाण्यात आले. पण चौकशीत जी माहिती समोर आली ती फारच धक्कादायक होती.
ही घटना मंगळवार 10 सप्टेंबरची आहे. एक जोडपं बुलडाण्याच्या अनाथाश्रमात आलं आणि म्हणालं की, ते लोणार जिल्ह्यातून आले आहेत. त्यांनी ही मुलगी एका वेड्या बाईसोबत पाहिली, जर ती मुलगी त्या वेड्या बाईकडे राहिली तर ती मरेल, म्हणून आम्ही तिला तुमच्याकडे सोपवत आहोत. अनाथाश्रमातील लोकांनी त्या जोडप्याला पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती देण्यास सांगितले. काय करावं, या द्विधा मनस्थितीत दाम्पत्य होतं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवसाची मुलगी भुकेने व्याकूळ होत रडत होती. रात्री आठच्या सुमारास या दाम्पत्याने त्या निरागस मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि त्यांनी अनाथाश्रमाला सांगितलेली गोष्ट एसएचओ नरेंद्र ठाकरे यांना सांगितली. प्रशासन याबाबत बुलडाणा एसएचओ नरेंद्र ठाकरे यांनी लोणार पोलीस ठाण्याचे अधिकारी निमेश मेहेत्रे यांना माहिती दिली असता एक धक्कादायक प्रकार समोर आला.
लोणार पोलिसांनी या दाम्पत्याकडे चौकशी केली असता, ही मुलगी या दाम्पत्याची नात असल्याचे समोर आले. त्यानंतर या दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीशी कोणाचे तरी अनैतिक संबंध होते, त्यामुळे ती गर्भवती राहिल्याचे उघड झाले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लोणार पोलिसांनी तत्काळ आपले खबरी पाठवून प्रकरणाचा तळ गाठला, तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देणाऱ्या मध्यमवयीन आरोपीला अटक केली. लोणार पोलीस ठाण्यात मध्यमवयीन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने या निष्पाप नवजात मुलीला बुलडाण्याच्या शासकीय रुग्णालयात पाठवले, सिव्हिल सर्जनने तिला आयसीयूमध्ये ठेवले असून, मुलीला किमान 15 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सध्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. योगिता डुकरेही कर्तव्य संपवून त्या निरागस मुलीला पाहाण्यासाठी रुग्णालयात चक्कर मारतात.
महिला कॉन्स्टेबल योगिता डुकरे यांना फुटला मायेचा पाझर – योगिता यांच्यातील मातृत्वाला पाझर फुटला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना त्या निरागस बाळाला दूध पाजता येईल का, अशी विचारणा केली.मुलीच्या रडण्याने सर्व पोलीस कर्मचारी काळजीत पडले होते, लगेच महिला पोलीस कर्मचारी योगिता यांना नवजात मुलीला दूध पाजण्यास परवानगी देण्यात आली. अनोळखी मुलीनेही अनोळखी आईच्या छातीला बिलगून दूध पिण्यास सुरुवात केली. 15 ते 20 मिनिटे दूध पिल्यानंतर निरागस मुलगी झोपी गेली.