एक मित्र म्हणाला मला तुझे रक्त प्यायचे आहे. तर दुसऱ्याने त्याचे रक्त सांडवले
पुणे / नवप्रहार मीडिया नेटवर्क
शहरात दोन चांगक मित्र होते. भिन्न धर्माचे असून सुद्धा त्यांच्यात इतकी जबरदस्त मैत्री होती की, वेटाळातल लोकं एक दुसऱ्यांना त्यांच्या मैत्रीचे उदाहरण द्यायचे . पण एक दिवस त्यांच्यात वादाची ठिणगी पडली.कारण इस्त्रियाक याने एक दिवस राहुल याला मला तुझे रक्त प्यायचे आहे म्हणून त्याच्या मानेला चावा घेतला होता.या घटनेने राहुल धास्तावला होता. इस्तियाक असे काही करू शकतो याची त्याला धास्ती होती. त्यामुळे राहुल ने इस्त्रियाक याचाच काटा काढला.
इस्तियाक, राहुल आणि त्याच्या मित्रांनी गुरुवारी रात्री मद्याची पार्टी केली. याच पार्टीत आधीच्या भांडणावरून राहुल आणि इस्तियाक यांच्यात वादाला तोंड फुटलं. तेव्हा इस्तियाक याने राहुलकडे मला तुझे रक्त प्यायचे आहे अशी अघोरी इच्छा व्यक्त केली. इतकच नाही तर इस्तियाक उठला आणि रक्त पिण्याच्या उद्देशाने राहुलच्या मानेचा कडकडून चावाही घेतला. चवताळलेल्या इस्तियाकच्या तावडीतून राहुलने कशीबशी सुटका करून घेतली आणि पळ काढला. मात्र झालेल्या प्रकाराने अस्वस्थ झालेल्या राहुलने भयानक निर्णय घेतला.
चांगला मित्र असल्यामुळे राहुलला इस्तियाकविषयी संपूर्ण माहिती होती. तो कुठे जातो, कुठे झोपतो, कुठे राहतो याविषयी त्याला इत्यंभूत माहिती होती. मध्यरात्रीच्या सुमारास इस्तियाक आणि त्याचा मित्र घराबाहेर दगडी ओट्यावर झोपले होते. राहुल त्या ठिकाणी पोहोचला आणि झोपलेल्या अवस्थेत असलेल्या इस्तियाकच्या डोक्यात त्याने भला मोठा दगड घातला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.