विदेश

गाई सोबत गेला भलतेच करायला घडली आयुष्यभराची अद्दल 

Spread the love

ब्राझील / नवप्रहार डेस्क

                    काही लोक फारच विकृत मानसिकतेचे असतात. त्यांना मनुष्य आणि मुक्या प्राण्यांमधील फरक सुद्धा समजत नाही. त्यातल्या त्यात त्यांनी जर दारू ढोसली असेल तर मग ते राक्षसच बनतात. मनुष्य राक्षस बनला की मग तो कुठल्या स्तराला जाईल याचा नेम नसतो. असाच प्रकार ब्राझील मध्ये घडला आहे.

                ब्राझीलच्या समम्बाया येथे शेतात काम करणाऱ्या एका शेतमजूराचा मृतदेह  गाईच्या गोठ्यात आढळून आला होता. त्याच्या मृत्यूचे कारण समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. ४५ वर्षीय शेतमजूर गोठ्यात मृतावस्थेत आढळून आला होता. त्याच्या सहकाऱ्यांनी जेव्हा मृतदेहाची तपासणी केली तेव्हा त्याने निरोध घातल्याचं दिसून आलं. तसंच निरोधचं मोकळं पाकिटही तिथेच पडलेलं आढळलं. यावरून त्याने गाईबरोबर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला असावा आणि गाईने लाथ मारल्यानंतर तो बेशूद्ध होऊन मरण पावला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

डेलीमेल संकेतस्थळाने सदर वृत्त दिले आहे. ८ जानेवारी रोजी सदर घटना उघडकीस आली. शेतमजूराचा मृतदेह आढळण्याच्या आदल्या दिवशी शेतमजूर आणि त्याच्या मित्राने दिवसभर मद्यपान केलं होतं. मित्राने पोलिसांना सांगितले की, दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता मृत शेतमजूर दूध काढण्यासाठी गेला होता. मात्र तो बराच वेळ परतलाच नाही. आमच्या मालकांना सकाळी कॉफीसाठी दूध वेळेवर पोहोचले नाही, त्यामुळे आम्ही तातडीने गोठ्याकडे पोहोचलो.

“शेतातील गोठ्यात जाऊन पाहिले असता शेतमजूर जमिनीवर बेशूद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्यावेळी त्याने निरोध घातल्याचे दिसून आले. तसेच निरोधचे पाकीट जवळच पडल्याचेही आढळून आले”, अशी माहिती मृत शेतमजूराच्या मित्राने पोलिसांना दिली. शेतमजूराला बेशूद्ध अवस्थेत पाहून तात्काळ वैद्यकीय पथकाला बोलावले गेले. मात्र शेतमजूराला शूद्ध आलीच नाही. त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा अंदाज बांधला गेला. अशाच प्रकारची घटना जून २०२४ मध्ये स्पेन येथेही घडली होती.

ऐपोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मित्राने सांगितलेल्या कथनाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close