चांदुर रेल्वे येथील रक्षाबंधन सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला भगिनींचा सहभाग.
हजारो भगिनींनी बांधली आमदार प्रताप अडसड यांना प्रेमाची राखी
चांदूर रेल्वे (ता. प्र.) प्रकाश रंगारी
स्थानिक संताबाई यादव मंगल कार्यालयात आज मोठ्या उत्साहपूर्ण वातावरण आमदार प्रताप अडसड यांना हजारोंच्या संख्येने उपस्थित महिला भगिनींनी राखी बांधून लहान भावाला आशीर्वाद दिले
या रक्षाबंधनाच्या सोहळ्यात प्रचंड उत्साह महिलांचा सहभाग भारत माता की जय वंदे मातरम् च्या जयघोषा व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून महाराष्ट्र आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,शिक्षणाची जनक सावित्रीबाई फुले व भारत मातेच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आले यावेळी मंचावरील पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत बंजारा समाजातील भगिनींनी सुंदर नृत्य प्रस्तुत केले यावेळी महिला नेत्या अर्चना रोठे,बंडू भुते,डाॅ खंडार,स्वाती मेटे यांनी मंचावरून आपले विचार व्यक्त केले आमदार प्रताप अडसड यांनी आपले विचार व्यक्त करत म्हटले की रक्षाबंधनाची भेट म्हणून महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवत प्रत्येक बहिला ओवाळणी म्हणून भेट दिली तर धामणगाव विधानसभेचे आमदार प्रताप अडसड यांनी चांदूर रेल्वे शहरातील बहिनीच्या पिण्याचे पाण्याचा प्रश्न सोडविण्याकरिता 63 करोड 61 लाख रु च्या अमृत 2.0 योजने आणून नेहमी करीता शहरांतील महिलेना त्रासदायक असलेला पाणी टंचाई ही सोडवली येणाऱ्या दीड ते दोन वर्षात ही समस्या नेहमीकरीता सुटणार असल्याने बहिनीने भावाचे आभार व्यक्त केले यावेळी आमदार यांनी रक्षाबंधन सोहळ्यात उपस्थित सर्व बहिनीचे प्रेम व स्नेह पाहून बहिणींच्या समक्ष साक्षीने मी शब्द देतो की माझ्या या बहिणींच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहील कारण तुमच्याच सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो आणि तुमचा आशीर्वाद रुपी मताच देणं लागतं त्या अनुषंगातून मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या नात्याचे ऋण फेडण्यासाठी सदैव तत्पर आहे तुमचा हक्काचा भाऊ म्हणून केव्हाही हाक घ्या अश्या भावना आमदार यांनी व्यक्त केल्या यावेळी मंचावर विधानसभा प्रमुख जनार्दन रोठे,अर्चना रोंठे,पंचायत समिती सभापती प्रशांत भेडे,तालुका बबन गावडे ,शहर अध्यक्ष बंडू भुते,माजी सभापती गोटू गायकवाड,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तेजस वाट,युवा मोर्चा अध्यक्ष रोशन खेरडे,संदीप सोळंके,महिला भाजपा पूर्व नगरसेविका सुषमा खंडार,स्वाती मेटे,नंदा माने,सुरेखा ताडेकर,दिपाली मिसाळ,पूर्व उपसभापती देविका राठोड व भाजपा कार्यकर्ते वसंत खंडार,अनिल मोटवानी,बच्चू वानरे,अजय हजारे,नंदा वाधवानी,पप्पू भालेराव,छोटू देशमुख,जगदीश होले,समिर भेडे,राजू चौधरी,अमोल देशमुख,विलास तांडेकर व हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पणा जगताप तर आभार प्रदर्शन वंदना हजारे यांनी केले