क्राइम

अल्पवयीन मुलाला दारू पाजून त्याच्या सोबत  जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवणाऱ्या महिले विरोधात गुन्हा

Spread the love

संबंधा दरम्यानचा व्हिडीओ रेकॉर्ड करून केल्या जात होते ब्लॅकमेल 

मुलाने घरातील पैशे आणि दागिने देऊन देखील वारंवार होत होती पैशाची मागणी 

जळगाव / नवप्रहार मीडिया 

               मित्राच्या नात्यात असलेल्या महिलेने दारु पाजून अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवायला लावून त्याचे चित्रीकरण करून घेतले.आणि ते व्हायरल करणयाची धमकी देत पैशाची मागणी केली. मुलाने बदनामीच्या भीतीने एकदा घरातील नगदी आणि दागिने आणून तिची मागणी पूर्ण केली. पण ती त्याला वारंवार पैशाची मागणी करीत होती. शेवटी …….

         सुजल (काल्पनिक नाव ) हा लॉकडावून च्या काळात आपल्या गावी आला होता. फावल्या वेळेत तो मित्राला भेटायला जात होता. त्याची ओळख मित्राच्या नात्यातील महिलेसोबत झाल्याने तो तिच्या घरी जायचा. अश्यातच महिलेने त्याला एकदिवस दारू पाजली आणि दारूच्या नशेत

 अल्पवयीन मुलास दारू पाजून त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल करणाऱ्या महिलेसह चौघांविरुद्ध पाचोरा पोलिसांत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील एका मोठ्या गावातील या प्रकारामुळे समाजमन सुन्न व संतप्त झाले आहे.

कोरोना लॉकडाउनच्या काळात आपल्या परिवारासह तालुक्यातील आपल्या मूळ गावी आलेल्या अल्पवयीन मुलाच्या मित्राच्या नात्यात असलेल्या महिलेने अल्पवयीन मुलास दारू पाजून बळजबरीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले.

त्याचा व्हिडिओ तयार केला. पन्नास हजार रुपये आणून दे, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलाने घाबरून जाऊन घरातील पैसे व दागिने या महिलेला आणून दिले; परंतु पुन्हा तशीच मागणी दोन वेळा झाल्याने मुलाने झालेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.

त्यांनी संबंधित महिलेस जाब विचारला असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्यामुळे पीडित मुलाच्या पालकांनी पाचोरा पोलिसांत तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close