शाशकीय

मोटार सायकल व सायकल चोरणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

 

अंजनगाव सुर्जी (वार्ता ) दि 26 एप्रिल 2023 ला रॉयल इन्फील्ड बुलेट क्लासिक ३५० क एम एच २७ सी जे ८५४६ कि.अं. १,७०,००० रु ची कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने तक्रार अमोल नालट (वैदयकीय अधिक्षक ग्रामीण रूग्णालय अंजनगाव सुर्जी) यांनी दाखल केली होती .या अज्ञात चोरा विरुद्ध
अपराध क २९७/२०२३ कलम ३७९ भादवि
गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हयांचे तपासादरम्यान गुप्तबातमीदाराकडून माहीती मिळाली की चोरी गेलेली रॉयल इन्फील्ड कंपनीची मो.सा ही एका इसमाजवळ असून तो मलकापूर गावाकडून अंजनगाव कडे येत आहे. वरून सदर रोडवर नाकाबंदी करून त्या इसमास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विक्रम उर्फ विक्की संजय वानखडे वय २३ वर्ष रा. मलकापूर ता. अंजनगाव सुर्जी याचे ताब्यातून चोरी गेलेली रॉयल इन्फील्ड कंपची बुलेट जिचा के एम एच २७ सी जे ८५४६ कि. अं. १,७०,००० रु ची जप्त करण्यात आली आहे. त्यास पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेवून पो.स्टे. ला दाखल असलेल्या इतर गुन्हयाबाबत सखोल विचारपूस केली असता त्याने अप न २५७ / २०२३ कलम ३७९ भादवि मधिल यामाहा कंपनीची मोटार सायकल क एम एच २७ बी यु ६०९४ तसेच अप नं ५८० / २०२२ कलम ३७९ भादवि मधिल PROMOUNT कंपनीची सायकल हस्तगत करण्यात आले आरोपी नामे विक्रम उर्फ विक्की संजय वानखडे रा. मलकापूर ता. अंजनगाव सुर्जी याचे ताब्यातून एकुण २,००,००० रु चा माल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक , अम.ग्रा., अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिंद्र शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री दिपक वानखडे डी.बी पथकाचे पोहेकॉ विजय शेवतकर, नापोकॉ जयसिंग चव्हान, पोकॉ विशाल थोरात, पोकॉ शुभम मारकंड, यांनी केली. पुढील तपास अंजनगाव पोलीस करीत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close