बेकायदेशीर कारवाई केल्या बद्दल न.प. मुख्याधिकारी व अभियंता साकेत राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा असे व्यापारी संघटनेचे आर्वीचे ठाणेदार यांना निवेदन

आर्वी, प्रतिनिधी/पंकज गोडबोले
आर्वी : बेकायदेशीर कारवाई केल्या बद्दल न.प. मुख्याधिकारी व अभियंता साकेत राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा असे व्यापारी संघटनेचे आर्वीचे ठाणेदार यांना दि. ०३/१२/२०२३ रोजी दिले निवेदन
स्थानिक आर्वी शहर दिनांक ०२/१२/२०२३रोजी नगरपालिका आर्वी द्वारे अतिक्रमण हटवितांना बेकायदेशीर केलेल्या कारवाई बद्दल नगरपालिका मुख्याधिकारी नगरपालिका व अभियंता साकेत राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा असे पोलीस स्टेशन आर्वी येथे ठिय्या आंदोलन मांडले. व आर्वीचे ठाणेदार काळे यांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनामध्ये आम्ही व्यापारी संघटनेतर्फे नम्र निवेदन सादर करतो कि, दि. ०२/१२/२०२३ रोजी नगरपालिका आर्वी यांच्याद्वारे अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये कायदा व नियमांचे पूर्णपणे उल्लंघन करण्यात येऊन मनमर्जीप्रमाणे व भेदभाव पूर्ण कारवाई करण्यात आली. कुठल्याही दुकानदाराला अतिक्रमण बद्दल पूर्वसूचना व त्याच्या दुकानातील अतिक्रमणचे मोजमाप न करता व त्यांच्या जवळील कागदपत्रे अवलोकन न करता अवैध पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यामुळे अतिक्रमण हटवताना दुकानाचे व दुकानातील मालाचे नुकसान करण्यात आले याबद्दल व्यापारी व किरकोळ दुकानदार यामध्ये खूप रोष निर्माण झाला होता.
तसेच आर्वी पोलीस स्टेशन येथे सर्व व्यापारी आपापले दुःख व व्यथा मांडण्याकरिता जमले असता पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता अतिक्रमण बाबत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून ज्या काही दुकानादारांचे दुःख व व्यथा आहे त्या समजून घेतल्या व त्यावर सर्व व्यापाऱ्यांचे समक्ष मार्ग काढण्यात आला जे काही लीगल कागद पत्र असलेले दुकान आहे. त्या दुकानदारावर कुठलीही कारवाई केल्या जाणार नाही. व जे काही बेकायदेशीर अतिक्रमण कारवाई झाली त्याची रीतसर चौकशी करून त्या दुकानदारांना झालेल्या नुकसानाची न.प. फंडातून भरपाई करून दिल्या जाईल असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सुलेमान, उपाध्यक्ष अनिल लालवानी, सचिव सुरेश मोटवानी, विजय अग्रवाल, दीपक मोटवानी,अमित चांडक, प्रवीण जयसिंगपुरे, यांच्या समक्ष उपविभागीय अधिकारी सिरसाट साहेब यांनी सांगितले तसेच यावेळी ठाणेदार प्रशांत काळे यांनी उपविभागीय पोलीस अधीकारी खांडेराव, तहसीलदार काळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच नगरपरिषदे कडे स्थानिक नागरिकांच्या अनाधिकृत अतिक्रमण बाबत तक्रारी आल्या आहे. यानंतर इतर अनाधिकृत अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांची रीतसर चौकशी करून अतिक्रमण विषयी लीगल नोटीस दिल्या जाईल नंतरच अतिक्रमण कारवाई केल्या जाईल न.प. मुख्यअधिकारी यांनी सांगितले
व ज्यांचे लीगल दुकाने आहे. त्यांना दुकान लावण्यास परवानगी देऊन ठीया आंदोलन मागे घेण्यात आले.