विवाहित महिलेचा छळ,पतीसह दोन महिले विरूद्ध गुन्हा दाखल
वरूड/तूषार अकर्ते
विवाहित महिलेचा पती यांचेसह दोन महिलेने तिला सतत त्रास देवुन वारंवार तिला माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला असता या बाबत पिडीत महिलेने तीन वर्षानंतर अखेर वरूड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी पती सह दोन महिले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहिती नुसार फिर्यादी पिडीत महिलेचे लग्न दि.१५ जुन २०२० रोजी मोहन विनोद पारधी (३५) रा.दिल्ली यांचे सोबत रितीरिवाजाप्रमाणे झाले आहे. पिडित महिलेचा पती, सासू, दीर,ननंद या सर्वांनी संगणमत करून हिला माहेरून पैसे आणण्याकरिता लग्नाच्या एका महिन्यापासून ते आजपर्यंत तगादा लावत तिला कोणत्याही कारणावरून वाद करून मारहाण करून जीवाने मारण्याच्या धमक्या देऊन तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याने तिने अखेर या गोष्टीला कंटाळून त्यांचे विरुद्ध वरूड पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सदरील तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कलम ४९८ (अ),५०४,५०६,३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहे.