क्राइम

पैश्यावरून दोन मित्रात वाद एकाने दुसऱ्याला चाकूने भोसकले, मृत्यू 

Spread the love
आरोपीला तात्काळ अटक 
आर्वी / प्रवीण वानखेडे
             वर्धा जिह्यातील आर्वी शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दोन मित्रात कथित पैशाच्या देवाणघेवाण वरून उद्धवलेल्या वादात एकाने दुसऱ्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे शहरात काही काळासाठी खळबळ माजली होती. पण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
            पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आपसात चांगले मित्र असलेल्या अभिषेक ढोकणे आणि किरपाने यांच्यात कथित पैशाच्या देवाणघेवाण वरून स्थानिक बालाजी वॉर्ड येथे वाद झाला.  पाहतापाहाता वाद इतका विकोपाला गेला की किरपाने याने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने अभिषेक वर सपासप वार केले. त्यात अभिजीत ने जागीच प्राण सोडले.
          घटनेची माहिती मिळताच ठाणेदार डेहनकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.आज आरोपीला स्थानिक न्यायालयात उपस्थित केले जाईल.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close