नवरा नपुंसक आणि मानसिक रुग्ण , सासऱ्याने…. महिलेचा आरोप

बिजनौर / क्राईम रिपोर्टर
नवरा नपुंसक आणि मानसिक रुग्ण असल्याचा आरोप करत सासरा माझ्यावर संबंध बनवण्यासाठी दबाब टाकत असल्याचा खळबळजनक आरोप महिलेने केला आहे. सासऱ्याच्या कृत्याबाबत नवऱ्याला सांगितल्यावर नवऱ्याने आणि सासऱ्याने मिळून मारझोड केल्याचा आरोप महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
बिजनौरच्या हिमपुरदीपा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या एका गावातील हे प्रकरण आहे. नगीना पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात राहणाऱ्या तरुणीचं येथील एका तरुणासोबत लग्न झालं होतं. या तरुणीच्या मते, तिच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च केले होते. नव्या घरात आपली पोरगी सुखात राहिल. तिला काही त्रास होणार नाही, असं तिच्या कुटुंबीयांना वाटत होतं. पण लग्नाच्या काही काळानंतर तिच्या सासरी वादाला सुरुवात झाली.
कुटुंब सासऱ्यावर अवलंबून
सासरच्या मंडळीकडून पाच लाख रुपये आणि एका कारची मागणी होऊ लागली. तिने ही मागणी पूर्ण न केल्याने तिला माराहण करण्यात येत होती. महिलेच्या मते, तिचा नवरा काहीच काम करत नाही. तर सासरा नोकरी करतो. घर खर्चासाठी संपूर्ण कुटुंब सासऱ्यावर अवलंबून आहे. या महिलेने तक्रारीत अनेक गंभीर गोष्टी सांगितल्या आहेत. माझा नवरा नपुंसक आहे. तो मानसिक रुग्ण आहे. अशा परिस्थितीत नवऱ्यावर उपचार करायचं सोडून सासऱ्याने त्यांच्याशी संबंध बनवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला, असा आरोप या महिलेने केला आहे.
घरातून हाकलले
जेव्हा मी माझ्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली. तर त्याने माझी साथ देण्याऐवजी मलाच मारहाण करायला सुरुवात केली. सासरी मला होणारा त्रास समजून घेण्याऐवजी माझा छळ करण्यात येऊ लागला, असं या महिलेने म्हटलं आहे. हुंड्यासाठी माझा नवरा, सासू, सासरा, चुलत सासरा, मामे सासरा, दीर आणि नणंद मला मारहाण करत होते. मला घरातूनही हाकलून देण्यात आलं होतं, असा आरोप या महिलेने केला आहे.
या सर्व त्रासानंतरही ती 5 ऑक्टोबर रोजी परत सासरी आली. पण तिथे आल्यावर परत तिला मारहाण करण्यात आली. तिचा छळ करण्यात आला. मी 15 ऑक्टोबर रोजी कपडे बदल होते. तेव्हा माझा व्हिडीओ बनवला गेला. चुकीचं काम करावं म्हणून सासरचे लोक मला त्रास देत होते, असा आरोप या महिलेने केला आहे.
पोलीस काय म्हणाले?
दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावर हिमपूरदीपा पोलीस ठाण्याचे एसएचओ रवि करण सिंह यांन मीडियाशी संवाद साधला. आम्हाला महिलेची तक्रार मिळाल्यानंतर आम्ही त्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेचा सासरा फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी आमच्या टीम काम करत आहेत, असं रवि करण सिंह म्हणाले.




