दामिनीची हत्या एकतर्फी प्रेमातून

सिंधुदुर्ग / विशेष प्रतिनिधी
घरात अठराविश्व दारिद्र्य, आई वडिलांना अहोरात्र काबाडकष्ट करतांना पाहून डोळ्याच्या कडा ओल्या व्हायच्या. पण आपण शिकून आई वडिलांच्या या कष्टावर पूर्णविराम लावू असा मनात केलेला प्रण आणि शिकून मस्तपैकी नोकरी करून आईवडिलांना आयुष्यात मिळाले नाही ते सुख देण्याचे ध्येय ! आणि त्यासाठी अभ्यासात स्वतःला गुंतवून इतर सगळ्या गोष्टीवर पाणी फेरत दामिनी भरपूर मेहनत घेत होती.आणि या मेहनतीचे चीज देखील झाले. हे प्रकरण आहे कोकणातल्या कुडाळ तालुक्यातील वर्दे सारख्या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या गावातील दामिनी पालव या तरुणीचे.
हॉटेल मॅनेजमेंट चा अभ्यासक्रम पूर्ण करून ती नोकरीच्या शोधात असताना तिच्या कॉलेज मधून तिला कॉल येतो की तिला मुंबई मध्ये नोकरी लागली आहे. ही बातमी ऐकताच तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती माहिती घेण्यासाठी कॉलेज ला जाते. ही आनंदी वार्ता ती आईला कळविते.आईला हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी तुला काय हवंय ? अशी विचारणा करते. मुलीचे कष्ट आणि आर्थिक परिस्थिती बघता ती फक्त वडापाव घेऊन ये आपण मिळून खाऊ ! असे बोलते. दामिनी कडावल येथील दुकानातून आईसाठी वडापाव घेते. भविष्याची स्वप्ने रंगवत पायीच घराकडे निघते. पण तिला याची पुसटशीही कल्पना नसते की समोर म्हणजेच अगदी घरापासून ५०० मीटर अंतरावर मृत्यू तिची वाट पाहत आहे.
ती घराच्या दिशेने निघाली असता गावाकडे जाणाऱ्या पुलाजवळ तिला साहिल धुरी जो वेंगुर्ल्यातील मठ गावातील तरुण. साहिल हा दामिनी किरण पालव शिकत असलेल्या पिंगुळीतील वर्देकर-पाटकर कॉलेजमध्ये पुढच्या वर्गात शिकत होता. दामिनी साहिल ला ओळखत असल्याने साहिल ने आवाज दिल्यावर ती थांबते. साहिल तिला पुलाच्या खाली चलण्याची विनंती करतो. गावकरी ये जा करत असल्याने ती त्याच्या मनात काय सुरू आहे याचा विचार न करता पुलाखाली जाते. तो तिला ओढ्याकडे नेतो. आणि तिच्यावर चाकूने सपासप १८ – २० वार करत निघून जातो.
साहिलचे दामिनीवर एकतर्फी प्रेम होते. पण दामिनी या पासून अनभिज्ञ. दामिनी ला मुंबईत नोकरी लागली आहे हे कळताच दामिनी आता आपल्या हातून कायमची निघून जाईल ? या शंकेने साहिल ला घेरले होते. त्यामुळे दामिनीच्या विरहाने तो विचलित झाला होता. ‘ तू मेरी नहीं हो सकी तो ,किसी और की भी होने नहीं दूंगा ‘ असला तो विचार करत होता. आणि तो सुडाच्या भावनेने पेटून उठला होता.
आरोपी कुडाळपासूनच तिच्या एसटीच्या मागोमाग दुचाकीवरून येत होता. ती कडावलला उतरल्यावर तो तिच्या पुढे गेला आणि पुलाजवळ गाडी रस्त्यावर उभी करून तिची वाट पाहत थांबला.
दोघात संभाषण आणि वाद
दामिनी पुलाजवळ पोहोचल्यावर त्याने तिला बोलण्याच्या बहाण्याने रस्त्यावरून खाली बोलावले. ओळखीचा असल्याने व रस्त्यावरून गावकरी जात असल्याने काही संशय न येता ती त्याच्याशी बोलण्यासाठी पुलाखाली गेली. साहिलने तीला एका बाजूला ओढ्यात बोलण्यासाठी नेले.अमानुष हल्ला
पूर्वीचे एकतर्फी प्रेम, नकार आणि ती मुंबईला निघून जाणार ही चीड मनात ठेवून आरोपीने तिच्यावर तीव्र रागातून धारदार शस्त्राने एकापाठोपाठ १७ ते १८ वार केले. यानंतर पुरावा नष्ट करून पळ काढला. हत्येनंतर आरोपीने तिचा मोबाईल बंद (स्विच ऑफ) केला, सोबत घेतला आणि गाडीवरून पसार झाला.अधुरं राहिलेलं स्वप्न दामिनीची करुण कहाणी
कोकणातल्या कुडाळ तालुक्यातील वर्दे सारख्या निसर्गरम्य वातावरणात, गरिबीच्या झळा सोसत दामिनीच्या घरात एक नवी पहाट उगवू पाहत होती. आई-वडिलांचे काबाडकष्ट, शेतात राबणारे हात आणि संसाराची ओढाताण दामिनीने लहानपणापासून पाहिली होती. या गरिबीच्या चक्रातून कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी तिने एकच मार्ग निवडला होता,तो म्हणजे शिक्षण. हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात दिवस-रात्र एक करून ती शिकत होती. तिचे पाय जमिनीवर होते; वाडीत, सण-समारंभांत निष्कारण न भटकता ती फक्त आणि फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून होती. तिची मेहनत फळाला आली, निकाल चांगला लागला आणि शनिवारी कॉलेजमधून तो बहुप्रतिक्षित निरोप आला”दामिनी, मुंबईत तुझ्या नोकरीची व्यवस्था झाली आहे!”त्या क्षणी तिच्या मनात आनंदाचे कारंजे फुटले. इतक्या वर्षांचे कष्ट, उपाशीपोटी पाहिलेली स्वप्ने आता प्रत्यक्षात येणार होती. सोमवारी मुंबईला जायचे ठरले होते. शनिवारी संध्याकाळी एसटीतून कडावलमध्ये उतरताच तिने आनंदाने आईला फोन लावला. आई, तुझ्यासाठी काय आणू? आईने उत्तर दिले, काही नको… येताना फक्त दोन वडापाव घेऊन ये, आपण सगळे मिळून खाऊ लवकर ये…
दामिनी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे सुंदर स्वप्न एका क्रूर प्रवृत्तीच्या बळी ठरून कायमचे अधुरे राहिले. सिंधुदुर्ग जिल्हा या हत्याकांडाने हादरला असून एका आई-बापाला दामिनी सारखी कर्तृत्ववान आपली मुलगी कायमची सोडून गेली आहे.




