अजब गजब

लग्न जुळलेले तरुण तरुणीने हॉटेल मध्ये रुम केली बुक, सहवासात असताना तरुणाचा मृत्यू 

Spread the love

अलिबाग / विशेष प्रतिनिधी 

                      लग्न जुळलेले तरुण तरुणी फिरण्यासाठी अलिबाग येथे आले होते. त्यांनी तेथे रुम बुक केली. सहवासात असताना अचानक तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने काही काळासाठी खळबळ माजली होती. तरुणीने तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करून तरुणाच्या नातेवाईकांना याची माहिती दिली.

तरुण आणि तरुणी दोघेही एकमेकांच्या सहवासात असताना हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे. तसेच या संशयास्पद मृत्यू प्रकरणी डॉक्टरने घेतलेल्या निर्णयामुळे या घटनेचे गूढ अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचे नुकतेच लग्न ठरले होते. त्यामुळे तो होणाऱ्या पत्नी सोबत अलिबागमध्ये वरसोली समुद्रकिनारी आला होता. यावेळी तरुणाने एका लॉजवर रुम बुक केली होती. खोलीत एकमेकांच्या सहवासात असताना अचानक २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तरुणीने तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला, तसेच कुटुंबियांनाही घटनेची माहिती दिली. यावेळी तरुणाचे नातेवाईक रुग्नालयात दाखल होताच मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे नाही, असे सांगितले. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच हस्तक्षेप करत मुलाचा मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणला. तसेच घटनेचे गांभीर्य पाहता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

सध्या या घटनेप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु असून शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती अतिरीक्त शल्यचिकीत्सक डॉ. शितल जोशी यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close