क्राइम

बोगस कस्टमर रिक्वेस्ट फॉर्म च्या माध्यमातून मोबाईल नंबर आणि मेल आयडी बदलून फ्रॉड 

Spread the love

बँकेच्या माजी व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्याचा प्रताप

मुंबई /विशेष प्रतिनिधी 

                  मृत महिलेच्या बँक खात्यातून बोगस कस्टमर  फॉर्म चा वापर करून मेल आयडी आणि पंजीकृत (रजिस्टर ) मोबाईल नंबर बदलवून तिच्या खात्यातून 29.83 लाख रूपये काढणाऱ्या माजी बँक व्यवस्थापक आणि त्याला या कामात साथ देणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलीं आहे. हा प्रकार एका खाजगी बँकेत घडला आहे. याप्रकरणी सेंट्रल सायबर पोलिसांनी माजी ब्रँच हेड राहुल पंजवानी आणि बँक कर्मचारी अभिषेक वर्माला सोमवारी अटक केली.

मोबाईल नंबर, मेल आयडी बदलला

बँकेच्या मृत ग्राहक विमला पाटील यांच्या खात्याला लिंक असलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीमध्ये रिक्वेस्टशिवाय बदल केल्याची तक्रार सुरूवातीला प्राप्त झाली, यानंतर बँकेने इंटरनल इन्क्वायरी केली, ज्यात जुलै 2025 मध्ये हे बदल कस्टमर रिक्वेस्ट फॉर्मच्या माध्यमातून केले गेल्याचं स्पष्ट झालं. हा फॉर्म ताडदेव ब्रँचमध्ये जमा केला गेला होता. फॉर्मवर केलेली सही बँक रेकॉर्डमध्ये असलेल्या विमला पाटील यांच्या सहीसोबत मॅच होत नसल्याचं समोर आलं.

तपासादरम्यान राहुल पंजवानीने हे बदल करण्याचे आदेश आपल्याला दिल्याचं अभिषेक वर्मा म्हणाला. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बदलल्यानंतर आरोपी मृत विमला पाटील यांच्या खात्यापर्यंत पोहोचले, त्यांनी खात्यात असलेली दोन फिक्स्ड डिपॉझिट वेळेआधीच बंद केली. या दोन एफडीची एकूण रक्कम 14.87 लाख रुपये होती, ही रक्कम वेगवेगळ्या माध्यमांमधून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केली गेली.वेगवेगळ्या खात्यांमध्ये फिरवली रक्कम

ही रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी RTGS, NEFT, UPI, IMPS आणि मोबाईल बँकिंगसारख्या माध्यमांचा वापर केला गेला, असं पोलिसांनी सांगितलं आहे. ट्रान्जक्शन हिस्ट्री तपासताना तीन वेगवेगळ्या RTGS ट्रान्जक्शनमधून 5-5 लाख म्हणजेच 15 लाख रुपये दुसऱ्या बँक खात्यात जमा केले गेले. तपासादरम्यान काही रकमेची देवाणघेवाण ज्वेलरी दुकानातही झाल्याचं समोर आलं आहे. सेंट्रल सायबर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

राहुल पंजवानी, अभिषेक वर्मा आणि राम पाल यांनी हा कट रचला आणि मृत ग्राहकाच्या नावावर रिक्वेस्ट फॉर्म तयार केला आणि त्यावर खोटी सही केली, असा आरोप बँकेने केला आहे. याप्रकरणातला राम पाल हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सध्या पोलीस या कटाबाबत तसंच पैसे किती ठिकाणी फिरवले गेले, याचा तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close