क्राइम

पोलिसांच्या नाकाखाली सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय 

Spread the love
नांदेड /विशेष प्रतिनिधी
                      नांदेड च्या शिवाजी नगर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर एका एका स्पा सेंटर मध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्याजवळ फुले मार्केट नावाच्या मोठ्या व्यापारी संकुलात वेलनेस स्पा सेंटरमध्ये देहव्यापार सुरू होता. पोलिसांना याबद्दल गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाड टाकत सात महिलांची सुटका केली आहे.
बनावट ग्राहक पाठवला अन्…
अखेरीस या स्पा सेंटरच्या काळ्या कृत्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. वेलनेस स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहकाकडून चार हजार रुपये घेण्यात आलं. बनावट ग्राहकाने इशारा देताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी तिथे नेपाळ, नागालँड, नवी दिल्ली, ठाणे आणि पुण्यातील असा सात महिला आढळून आल्या होत्या. या सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
स्पा सेंटरचा मालक फरार
या कारवाईमध्ये स्पा सेंटरमधून तीन पुरुषांना ताब्यात घेण्यात आलं. आसाम येथील हीफझुल रहेमान, रहाज उद्दिन आणि याहीया अहमद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे पण, स्पा सेंटरचा मालक  संतोष बघे मात्र फरार झाला आहे.  पोलीस या फरार मालकाचा शोध घेत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close