क्राइम

अपहरण कर्त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या हाती लागले धबाड 

Spread the love

पुणे / विशेष प्रतिनिधी

                    अल्पवयीन मुलीच्या अपहरण करत्याचा तपास लावत असताना पोलिसांच्या हाती एक मोठे धबाड लागले आहे.  एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी रचलेल्या सापळ्यात केवळ अपहरणकर्ताच नाही, तर ‘एमडी’ ड्रग्जची विक्री करणारी टोळीच पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.

या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींपैकी 4 जणांना बेड्या ठोकल्या असून, शहरात पसरलेल्या ड्रग्जच्या विळख्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

14 गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सुनील ऊर्फ राठ्या राठोड (२८) याने एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, राठ्या कोंढवे-धावडे परिसरात येणार आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले, मात्र त्याच्या झडतीत केवळ मुलगीच नाही, तर एमडी ड्रग्जच्या पुड्या सापडल्या आणि तपासाचे पूर्ण चित्रच बदलले.

राठ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याचे साथीदार राजन नायर, जतीन कदम आणि शुभम दहिभाते यांना अटक केली. पोलिसांनी जेव्हा आरोपींचे मोबाईल जप्त केले, तेव्हा त्यात ड्रग्ज विक्रीचे मोठे जाळे उघड झाले. दरम्यान, याप्रकरणी सध्या अधिक तपास सुरु आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close