क्राइम

अशोक खरात बद्दल 10 धक्कादायक खुलासे 

Spread the love

                 लैंगिक विकृत असलेल्या अशोक खरातच्या कृष्ण लिलेचा भांडाफोड होताच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजळ माजली होती. आता या भोंदूबाबाच्या कृत्याची एक एक पाने उघडत आहेत. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. खरात याच्याबद्दल चे 10 धक्कादायक खुलासे

मर्चंट नेव्हीतील सेलर ते 200 कोटींचा मालक असलेला ‘कॅप्टन’ अशोक खरात आता पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटो समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने आयपीएस तेजस्वनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी (SIT) स्थापन केली आहे.

तपासातील 10 प्रमुख आणि धक्कादायक खुलासे

 

  1. शेतकऱ्यांचे पाणी संस्थानाला: 2020 मध्ये तत्कालीन सरकारने दारणा धरणातून खरातच्या ‘श्री शिवनिका संस्थान’साठी 39 लाख लिटर पाणी आरक्षित केले होते. सिन्नरसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे पाणी एका खासगी संस्थानाला वळवल्याचा हा मोठा आरोप आहे.
  2. राजकीय कनेक्शन: 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी सिन्नरमधील ईशानेश्वर मंदिरात खरातच्या उपस्थितीत पूजा केली होती. दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घडवून आणल्याचे बोलले जाते.
  3. वायग्रा मिश्रित ‘ओशनो जल’: अंजली दमानिया यांनी आरोप केला आहे की, खरात ‘ओशनो जल’ तयार करायचा, ज्यात वायग्रा मिसळली जायची. हे पाणी नेण्यासाठी बडे नेते हेलिकॉप्टर पाठवायचे.
  4. ‘मी कृष्ण, तू राधा’: महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी खरात “मी कृष्ण आहे आणि तू गेल्या जन्माची माझी राधा होतीस” असे सांगून त्यांचे शोषण करायचा.
  5. अघोरी विधी आणि अमली पदार्थ: पीडितेच्या डोक्यावर तांब्याचा लोटा ठेवून मंत्र म्हणण्याचे नाटक करायचा. त्यापूर्वी महिलांना गुंगीचे औषध असलेले पेढे आणि कडू-खारट पाणी पाजले जायचे, त्यानंतर तो अत्याचार करायचा.
  6. 200 कोटींची मालमत्ता: मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यावर खरातने अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली 200 कोटींची माया जमवली. नाशिकच्या पाथर्डीत त्याची 30 एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे.
  7. ‘कॅप्टन’ ते ‘भोंदू बाबा’ प्रवास: खरातचा दावा होता की त्याने 154 देशांचा प्रवास केला असून त्याला 15 भाषा येतात. नाशिकला परतल्यावर त्याने सिन्नरच्या डोंगरात मंदिर आणि ट्रस्ट बनवून स्वतःला ‘गॉडमॅन’ म्हणून प्रस्थापित केले. अनेक अधिकारी पदोन्नती आणि बदलीसाठी त्याच्याकडे सल्ल्याला येत असत.
  8. दैवी शक्तींच्या नावाखाली शोषण: नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेने एफआयआर दाखल केला आहे. तिने आरोप केला आहे की, खरातने दैवी शक्ती असल्याचा दावा करून तिचा विश्वास संपादन केला, त्यानंतर तिला शहरातील त्याच्या कार्यालयात बोलावून गुंगीचे औषध मिसळलेले पेय दिले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिच्या आरोपानुसार, हा अत्याचार 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होता.
  9. कायदेशीर कारवाई: एका 28 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64 (बलात्कार), 74 (धमकावणे) आणि जादूटोणा विरोधी कायदा, 2013 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. 18 मार्च रोजी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
  10. महाराष्ट्राचा ‘आसाराम’ : काँग्रेसने अशोक खरातची तुलना आसाराम बापूशी केली आहे. अंजली दमानिया यांच्या मते, पीडित महिलांची संख्या शेकडोंमध्ये असू शकते, ज्या भीतीपोटी पुढे येत नाहीत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close