क्राइम

मसाज पार्लर च्या नावाखाली चालणाऱ्या स्पा सेंटर मधून विदेशी महिलांसह भारतीय महिलांची सुटका

Spread the love
 
तीन अल्पवयीन मुलींचा समावेश

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात मसाज सेंटर म्हणजेच स्पा सेंटरचे प्रमाण वाढले आहेत. पण या स्पा सेंटरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी वेश्या व्यवसायला आळा घालण्यासाठी मोठं ऑपरेशन हाती घेतलं होतं. ज्यात त्यांनी स्पा चालकसह मॅनजेरसह 93 दलालांना गजाआड केलं आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ही मोठी कारवाई करत मोठा पदार्फाश केला आहे.

या स्पा सेंटरच्या छापेमारीतून पुणे पोलिसांनी जवळपास  207 महिलांपैकी 38 विदेशी तरुणींची सुटका केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या धडक कारवाईमुळे वेश्या व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्पा सेंटरमध्ये काम करण्यासाठी विदेशी तरुणी पर्यटनसह अन्य व्हिसावर भारतात प्रवेश करतात. त्यानंतर त्या शहरातील वेगवेगळ्या स्पा सेंटरमध्ये मसाज थेरपिस्ट म्हणून कामाला लागतात. खरंतर पर्यटन व्हिसावर भारतात नोकरी करता येत नाही. त्यामुळे या तरुणींनी नियमांचं उल्लंघन केल्याच स्पष्ट होतं.
पोलिसांनी सांगितलं की, अशा स्थितीत या विदेशी तरुणींना सर्वप्रथम भारत सोडून जाण्याची नोटीस दिली जाते. मग त्याचा पाठपुरावा करण्यात येतो. जर त्या नोटीस दिल्यानंतरही भारतात आढळल्यास त्यांनी सक्तीने भारताबाहेर पाठवले जाते. पोलिसांनी सांगितलं की,  1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या दोन महिन्यांच्या काळात पोलिसांनी 58 गुन्ह्यांची नोंद केली आहे. पोलीस ठाण्यांकडून 44 गुन्हे तर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने 14 गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर या स्पामधील वेश्या व्यवसायात अडकलेल्या 207 पीडित महिलांची सुटका पोलिसांनी केली असून यामध्ये 38 विदेशी महिला तर 169 भारतीय महिलांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे यात तीन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close