राजकिय

बच्चू कडू यांचेवर भाजपा आमदारांचा सनसनाटी आरोप

Spread the love

अमरावती / प्रतिनिधी

                       माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीसाठी महाएल्गार आंदोलन उभारले आहे. त्यांच्या आंदोलनाला विविध पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. आंदोलनाला.मिळणारा पाठिंबा पाहत सरकारने त्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. बच्चू कडू मुंबईला रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी त्यांच्या मुख्यमंत्री आणि शिष्ट मंडळासोबत बैठक होणार आहे. अशातच अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी कडू यांचे वर सनसनाटी आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

 भाजप नेत्यांकडून कडूंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत असल्याचे सांगणाऱ्या बच्चू कडूंनी स्वत:च्या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा गंभीर आरोप भाजप नेते प्रवीण तायडे यांनी केला आहे.

बच्चू कडूंवर गंभीर आरोप

भाजप नेते प्रवीण तायडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे ७२ एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत. या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केला आहे. कोटयवधींचा अवैध पैसा या परिसराच्या विकास कामांवर वापरण्यात आला.

बच्चू कडू राज्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करून त्यांनी या परिसरात शासनाचा निधी वापरला. गुटखा माफिया, लँड माफिया, वाळू माफिया, अवैध व्यवसायमध्ये भागीदारी असलेल्या लोकांकडून खंडणी गोळा करून हा परिसर विकसित करण्यात आल्याचे प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हा हवामहाल ताब्यात घेऊन सरकारने सील करावा. बच्चू कडू आणि त्यांच्याशी संबंधित असलेले लोक, संस्था आणि त्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीची देखील चौकशी करण्याची मागणी आमदार प्रवीण तायडे यांनी केली आहे.गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे ७२ एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत. या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केला आहे. कोटयवधींचा अवैध पैसा या परिसराच्या विकास कामांवर वापरण्यात आला. बच्चू कडू राज्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करून त्यांनी या परिसरात शासनाचा निधी वापरला. गुटखा माफिया, लँड माफिया, वाळू माफिया, अवैध व्यवसायमध्ये भागीदारी असलेल्या लोकांकडून खंडणी गोळा करून हा परिसर विकसित करण्यात आल्याचे प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

हा हवामहाल ताब्यात घेऊन सरकारने सील करावा. बच्चू कडू आणि त्यांच्याशी संबंधित असलेले लोक, संस्था आणि त्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीची देखील चौकशी करण्याची मागणी आमदार प्रवीण तायडे यांनी केली आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी बच्चू कडू आणि त्यांचं फार्म हाऊस नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले आहेत. तायडेंनी बच्चू कडूंच्या फार्म हाऊस आणि निवासस्थानाबद्दल जे गंभीर आरोप केले आहेत त्याची ड्रोन दृश्य देखील समोर आली आहेत.

बच्चू कडूंच्या निवासस्थान परिसरात काय आहे?

* अत्याधुनिक सुख सुविधा असलेलं बच्चू कडूंचे निवासस्थान.
* प्रहार पक्षाचं कार्यालय
* फळबाग असलेली उच्च प्रतीची शेती
* गारमेंट कारखाना
* मिक्सर प्लांट
* स्विमिंग पूल
* शाळा

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close