अजब गजब

देवारे देवा …हे काय ? एसटी बस ला दारच नाही

Spread the love

 

           भंगार आणि जुन्या भंगार बसेस मुळे एसटी म्हणजेच लालपरी नेहमीच चर्चेत असते. यावेळी मात्र ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. ही घटना     पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आगाराच्या एका एसटी ची आहे. या बसचा  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रवासी वाहतूक करत असताना या बसला चक्क दरवाजाच नसल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावर सर्वत्र तीव्र नाराजी आणि टीका व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दुरवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महाराष्ट्रातील अनेक बस आगारांमधील एसटी बसेसची अशीच दुरवस्था झाल्याचे यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. जुन्नरमधील ही घटना केवळ एक उदाहरण असून, राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना अनेकदा अशा धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागतो. राज्य परिवहन मंडळाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. एसटी बसेसच्या देखभाल-दुरुस्तीकडे अधिक लक्ष देण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close