राष्ट्रीय

काश्मीर मुद्द्यावरून रशियाने पाकिस्तानला फटकारले

Spread the love

                  पाकिस्तानकडून नेहमीच काश्मीर चा मुद्दा उपस्थित करून वादाला सुरवात केली जाते. पाकिस्तानच्या याच सवयीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला खाली मान घालण्याची वेळ आली आहे, अनेक देशांनी पाकिस्तानचा अपमान केला आहे.

मात्र तरी देखील त्यांची ही सवय काही केल्या जात नाहीये, पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे. एका पाकिस्तानी न्यूज चॅनवर बोलताना रशियाने पाकिस्तानला स्पष्टच सुनावलं आहे, काश्मीर मुद्द्यावर फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, तिसऱ्या कोणत्याही देशानं यामध्ये हस्तक्षेप करणं योग्य ठरणार नाही, असं रशियानं म्हटलं आहे.

पाकिस्तानी अँकरचा प्रश्न

पाकिस्तानच्या एका अँकरेन नुकतंच आपल्या टीव्ही चॅनलवरील एका कार्यक्रमामध्ये पाकिस्तानमधील रशियाचे राजदूत असलेले अल्बर्ट खोरेव यांना सहभागी केलं होतं, त्यावेळी त्यांना काश्मीरच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला, भारतानं घेतलेल्या भूमिकेमुळे काश्मीरचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे, भारताच्या भूमिकेमुळे काश्मीरचा मुद्दा हा अण्वस्त्र हल्ल्यांपर्यंत पोहोचू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न या कार्यक्रमात रशियाच्या राजदूतांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला रशियाच्या राजदूतांनी रोख ठोक उत्तर देऊन पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिली आहे, मला वाटतं काश्मीरचा मुद्दा हा फक्त भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाऊ शकतो, या मुद्द्यावर तिसऱ्या कोणत्याही देशानं हस्तक्षेप करू नये, भारतानं जी भूमिका मांडली तीच भूमिका आमची देखील आहे, असं रशियानं यावेळी म्हटलं आहे. या मुद्द्यावर तिसऱ्या कोणत्याही देशानं हस्तक्षेप करू नये,असंही रशियानं यावेळी म्हटलं.

भारताची भूमिका

भारतानं जम्मू काश्मीरबाबत यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यावर कोणत्याच आंतरराष्ट्रीय मंचावर कधीच चर्चा होणार नाही, आता फक्त प्रश्न आहे तो पीओकेचा पाक व्याप्त काश्मीरचा तर त्यावर द्विपक्षीय चर्चा केली जाईल, मात्र त्यामध्ये तिसऱ्या कोणत्याही देशाला हस्तक्षेप करता येणार नाही, अशी यावर भारताची भूमिका आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close