Uncategorized

अन्य तरुणासोबत हॉटेलमध्ये आलेल्या महिलेकडे करणे तरुणाला भोवले

Spread the love

   झाशी / प्रतिनिधी

            हल्ली विवाहबाह्य संबंधात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कौटुंबिक वाद वाढले आहेत. आणि त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील सदस्यांवर पडत आहेत. हॉटेल मध्ये प्रियकरासोबत आलेल्या महिलेला मदत करणे तरुणाला भोवले आहे. त्याची काहीच चूक नसताना देखील त्याला प्रसाद मिळालमा आहे.

आपली पत्नी, दुसऱ्या तरूणासोबत हॉटेलच्या रूममध्ये आहे, असं त्याला कळलं आणि तो संतापाने पेटून उठला. रागाच्या भरातच तावातावाने तो हॉटेलवर गेला खर आणि तिथे उपस्थित असलेल्या एका दुसऱ्याच, निर्दोष तरूणाला पत्नीचा प्रियकर समजून काहीही विचार न करता त्याची धुलाई केली. खरंतर त्याच पीडित युवकाने त्या इसमाच्या पत्नीला हॉटेलमधून बाहेर पडण्यास मदत केली होती, पण संतापलेल्या पतीने काहीही ऐकून न घेताच त्याच तरूणाची बेदम धुलाई केली. हा संपूर्ण घटनाक्रम व्हिडीओत कैद झाला असून तो सोशल मीडियावरही वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे.

विचार न करताच तरूणावर तुटून पडला

झाशीच्या मौरानीपूर पोलीस स्टेशन परिसरात एका पतीने आपल्या पत्नीला शेजारच्या तरुणासोबत हॉटेलमध्ये पकडल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. त्यानंतर संतापलेल्या पतीने सारासार विचार न करताच त्या तरुणाला पकडून त्याच्या दुकानात आणले आणि लोखंडी रॉडने त्याला बेदम मारहाण केली. ही मारहाम एवढी भयानक होती की तो बिचारा तरूण गंभीररित्या जखमी झाला.

सोशल मीडिया पर व्हिडीयो व्हायरल

एवढंच नव्हे तर भांडणाच्या वेळी त्या पीडित तरूणाचे वडील आणि भाऊ त्याला वाचवण्यासाठी पोहोचले तेव्हा हल्लेखोराने त्यांनाहीसोडलं नाही आणि त्यांच्यावरही हल्ला चढवला. मारहाणीत वाईटरित्या जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने मौरानीपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तेव्हा तिथेच आसपास असलेल्या कोणीतरी मारहाणीची ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद करत व्हिडीओ बनवला आणि तोच व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका तरूणाला काही लोक अत्यंत क्रूरपणे मारहाण करत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

पीडित तरूणाने केली होतची पत्नीची मदत

सोनू उर्फ ​​प्रमोद आर्य असे मारहाण झालेल्या पीडित तरूणाचे नाव आहे, त्यानेच त्याची आपबिती सांगितली.तो म्हणाला की, तो काही कामासाठी हॉटेलमध्ये गेला होता तेव्हा एका महिलेचा पती आणि तिचे सासरचे लोक तिथे आले. त्या दरम्यान, त्या महिलेने हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी सोनूकडे मदत मागितली, परंतु तो तिला मदत करत असतानाच महिलेचा नवरा तिथे आला आणि चुकून सोनूलाचा त्याच्या पत्नीचा प्रियकर समजला. तोपर्यंत ती महिला आणइ तिचा प्रियकर तर तिथून पळूनही गेले. यानंतर,त्या महिलेचा पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सोनूला पकडून बेदम मारहाण केली.

प्रियकरासोबत पत्नी हॉटेलमध्ये आहे..

ही सर्व मारहाण करणारा पती मुकेश आर्य यानेही त्याची बाजू मांडली. तो म्हणाला की ,त्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडून माहिती मिळाली की त्यांची पत्नी दुसऱ्या तरुणासोबत हॉटेलमध्ये आहे. ते ऐकून त्याने हॉटेल गाठलं, तेव्हा त्याने पत्नीला तिच्या शेजारी असलेल्या सोनूसोबत पाहिले आणि तो भयानक संतापला, त्याचं नियंत्रणच सुटलं आणि मारहाण केली. तर दुसरीकडे, त्या महिलेने पोलिसांसमोर जबाबा दिला, ती म्हणाली की, ज्या पुरुषाचे नाव घेतले आहे त्याच्याशी तिचा कोणताही संबंध नाही. ती दुसऱ्या कोणाला तरी भेटायला गेली होती, पण तिचा शेजारी सोनूच त्या सगळ्यात अडकला आणि त्याला मार खावा लागला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close