चीन युद्धासाठी सज्ज, 13 फायटर जेट आणि सहा नौदलाच्या नौका सीमेवर तैनात

अमेरिकेने चायना वर टॅरिफ लावल्याने चायनाने अमेरिकेला रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात केली जात होती, मात्र ही निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, याचा सर्वात मोठा फटका हा अमेरिकेला बसला आहे. कारण अमेरिका रेअर अर्थ मिनिरल्ससाठी पूर्णपणे चीनवरच अवलंबून आहे, हा धक्का अमेरिका पचवतो न पचवतो तोच चीनने दुसरा मोठा धक्का अमेरिकाला दिला तो म्हणजे चीन हा अमेरिकेत उत्पादीत होणाऱ्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार देश होता.
मात्र चीनने आता ही सोयाबीनची खरेदी पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या या दोन निर्णयांमुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी अखेर मोठी घोषणा केली, अमेरिकेनं चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावला. चीन आणि अमेरिकेत सुरू झालेल्या या व्यापार युद्धामुळे वातावरण तापलेलं असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनं जगभरात खळबळ उडाली आहे.
चीन पुन्हा एकदा तैवानवर आक्रमण करण्याचा स्थितीमध्ये आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार चीनी सैन्यांनी 13 फायटर जेट, आणि सहा नौवदलाचे जहाज तैवानच्या आसपास तैनात केले आहेत. यातील आठ लढाऊ विमानांनी तर तैवानच्या जलडमरूची मध्य रेखा पार करून तैवानच्या दक्षिण -पश्चिम आणि दक्षिण पूर्वेच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केल्याचा दावा देखील संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. आम्ही या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं देखील तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
काय आहे संरक्षण मंत्रालयाचा दावा
तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं या संदर्भात आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चीनी सैन्याचे तेरा लढाऊ विमानं आणि सहा नौदलाचे जहाजं तैवानच्या हद्दीच्या जवळ पाहाण्यात आले आहेत. आमचं सैन्यांची या जहाजांवर आणि विमानांवर करडी नजर आहे. त्यांनी आमच्या हवाई क्षेत्रात घुसरखोरी देखील केली आहे, परिस्थिती यापेक्षा अधिक गंभीर बनल्यास आम्ही त्यांना योग्य ते उत्तर देऊ आमचं सैन्यदल त्यासाठी तयार आहे. चीनकडून तैवानवर सातत्यानं सैन्य दबाव निर्माण केला जात आहे, त्याचा एक भाग म्हणून चीनच्या या हालचालींकडे पाहिलं जात आहे. यापूर्वी देखील चीनने असा प्रयत्न केला आहे, मात्र यामुळे युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.