डान्सिंग कार पाहून लोकं जवळ गेल्यावर दिसला.भलताच प्रकार

बदलापूर / विशेष प्रतिनिधी
अनैतिक कृत्य करायला जोडप्यांना हॉटेल्स आणि लॉज कमी पडताहेत की काय ? असा प्रश्न एका सोसायटी समोर रोज येऊन उभ्या राहणाऱ्या डान्सिंग कार मुळे उभा राहिला आहे. लोकांना शंका गेल्यावर त्यांनी जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता ते जोडपे पळून गेले.
सोसायटीच्या समोर चारचाकी गाडी लावून नको ते कृत्य करत असल्याचं समोर आलेय. सोसायटीमधील काही महिलांना आणि लोकांना ही गाडी सारखी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लोकांनी त्या गाडीचा व्हिडिओ, फोटो काढले. काही जणांनी गाडीकडे जाण्याचा प्रयत्न केला.. पण तो पर्यंत ती ओमीनी गाडी निघून गेल्याचं स्थानिकांनी सांगितले. या प्रकारामुळे बदलापूर पश्चिममधील सोसायटीत राहणारे नागरिक संतप्त झाले असून जाब विचारला आहे. लहान मुलं आणि तरुण पिढीवर याचा काय परिणाम होईल? अशी संतप्त प्रतिक्रिया एका महिलेने दिली आहे.
बदलापूरमध्ये सोसायटीच्या समोर चार चाकी वाहनात गैरवर्तन सुरू होते. त्याकडे काही महिलांचे लक्ष गेले. त्यांनी याबाबतचा व्हिडिओ काढला. सोसायटीमध्ये लहान मुले, मुली बाहेर फिरत असतात, त्यांच्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. या गृहसंकुल परिसरात अतिशय गंभीर घटना घडली आहे. याबाबत स्थानिकांकडून संतप्त प्रतिक्रिया दिली. प्रत्यक्षदर्शीने ही गाडी दोन दिवसांपासून सोसायटीच्या बाहेर उभी असते. ती गाडी जोरात हालत असल्याने संशय आला म्हणून व्हिडिओ काढल्याचे सांगितले. इथे लहान मुले खेळतात, त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दोन दिवसांपासून ओमनी गाडी इथेच उभी राहते. त्या गाडीला पूर्ण ब्लॅक फिल्म लावलेली आहे. गुरूवारी एका महिलेच्या निदर्शनास गाडी आली.. त्या गाडीकडे पाहत असल्याचे समजताच त्यांनी तेथून धूम ठोकली. शुक्रवारी त्याच परिसरात गाडी उभी होती. एका व्यक्तीने ती गाडी जोरा जोरात हालत होती, ते पाहिले. ते पटकन खाली आले. त्याचवेळी गाडी निघाली अन् गौरी हॉलच्या जवळ उभी केली. आम्ही तिथे जाऊन नेमकं आत कोण आहे? हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला पाहून गाडी सुसाट वेगाने काढले. नशीबाने आम्ही थोडक्यात वाचलो, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
सोसायटीच्या बाहेर फिरण्यासाठी, रमण्यासाठी आम्हाला इतकाच परिसर आहे. त्यातही असे धंदे होत असतील, तर लहान मुलांना बाहेर पाठवायचे की नाही? रात्री बाहेर पाठवणं कठीण आहे. अशी दहशत असेल तर लहान मुलींना क्लासला कसं पाठवायचे, असा सवाल एका व्यक्तीने उपस्थित केला. दरम्यान, बदलापूरमध्ये या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.