सामाजिक

बायकोने नवऱ्याला पाहिले प्रेयसी सोबत आणि रस्त्यात झाला राडा 

Spread the love

कानपूर / प्रतिनिधी

            बायकोला नवऱ्यावर संशय असल्याने ती नवऱ्यावर पाळत ठेवून होती.  आणि तिने त्याला रस्त्यात प्रेयसी सोबत रंगेहाथ पकडले मग त्यानंतर भर रस्त्यात सुरू झाला राडा. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये रस्त्याच्या ही घटना घडली आहे. दरम्यान कोणीतरी याघटनेचा व्हिडिओ बनवला आणि आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसतंय की, बायको आणि गर्लफ्रेंड रस्त्यावर सगळ्यांच्या समोर एकमेकांवर हल्ले करत आहेत. अहवालांनुसार ही घटना कानपूरमधील नारवाल मोडजवळ घडली. महिलेने तिच्या नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिल्यावर तिने त्याला जाब विचारला, त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद वाढला आणि त्यानंतर जोरदार भांडण झाले. ही घटना एका उपस्थिताने कॅमेरात टिपली.

अहवालांनुसार, महिलेने आधीच आपल्या नवऱ्यावर अफेअर असल्याचा संशय घेतला होता, जो खरा ठरला. बायकोला समोर पाहून नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड हादरले. सुरुवातीला नवरा आणि बायकोमध्ये वाद झाला. नंतर नवऱ्याने भररस्त्यात बायकोच्या कानाखाली मारलं, त्यानंतर गर्लफ्रेंडने बायकोवर हल्ला केला.

व्हिडिओमध्ये नवरा त्याच्या गर्लफ्रेंडला समर्थन करताना दिसतो आहो आणि तिला बायकोला मारायलाही सांगतोय. रस्त्यावर दोघींची भांडण सुरू असताना तो गर्लफ्रेंडला ‘तिला अजून मार, अजून मार याला’ असं ओरडताना दिसतोय.

तिथे उपस्थित असलेले लोक नवऱ्याला हस्तक्षेप करून भांडण थांबवण्यास सांगत आहेत असं ऐकू येतंय. कारण तो रस्त्याच्या कडेला उभा राहून हे सगळं फक्त बघतोय. नंतर नवऱ्याने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, पण बायकोने त्याचं ऐकलं नाही आणि त्याला ढकलत राहिली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @TrueStoryUP या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “कसा माणूस आहे, बायको असतानाही असं कसं करतात लोक” तर दुसऱ्यानं “चोर तो चोर वर शिरजोर, तिने घटस्फोट घेतला पाहिजे” अशी कमेंट केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close