अजब गजब

शासकीय रुग्णालयाच्या दुखणं डोक्याला आई पट्टी गुडघ्याला चा प्रकार आला समोर 

Spread the love

बाधित रुग्ण सोडून भलत्यावरच करणार होते उपचार 

जालौन (युपी) / नवप्रहार ब्युरो 

         शासकीय रुग्णालयातील अजब गजब प्रकार नेहमीच वाचण्यात येतात. त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. ज्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती त्याऐवजी भलत्याच रुग्णाला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले होते. रुग्णाने तेथून पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणात दोन डॉक्टर आणि तीन परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे. ब्रजेश चौधरी असे त्या नशीबवान दुर्दैवी रुग्णाचे नाव आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्याच्या तयारीत असलेल्या रुग्णाला जबरदस्तीन ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. त्याला ऑपरेशन थिएटरमधील कपडे घालण्यास सांगण्यात आले. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी खुणा करण्यात आल्या.

काहीतरी अघटित घडत असल्याची कल्पना रुग्णाला आली आणि त्यानं ऑपरेशन थिएटरमधून धूम ठोकली. सध्याच्या घडीला दोन डॉक्टर आणि तीन नर्सवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. समितीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.

उत्तर प्रदेशच्या जालौनमधील वैद्यकीय महाविद्यालयात चुकीच्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. सुदैवानं रुग्णानं ऑपरेशन थिएटरबाहेर धाव घेतल्यानं तो वाचला. या घटनेची दखल उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रजेश पाठक यांनी घेतली. त्यांनी या प्रकरणी निलंबनाचे आणि चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. ‘उरई वैद्यकीय महाविद्यालयात ऑपरेशन टेबलवर चुकीच्या रुग्णाला झोपवण्यात आल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी द्विसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे,’ असं पाठक यांनी सांगितलं.

चुकीच्या रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेणाऱ्या दोन डॉक्टर आणि तीन नर्स यांना पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले गेले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येईल.

माधवगढच्या डिकोली गावात राहणाऱ्या ब्रजेश चौधरीच्या आतड्यांना सूज आली होती. त्यामुळे त्याला गेल्या सोमवारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वॉर्ड नंबर सातमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला २ दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला. बुधवारी त्याला डिस्चार्ज मिळेल, असं सांगण्यात आलं होतं. पण बुधवारी त्याला दोन वॉर्डबॉय तपासणी करायची असल्याचं सांगून ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. त्यानंतर शस्त्रक्रियेची तयारी सुरु झाली.

ब्रजेशनं वॉर्डबॉय यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते काहीही ऐकून घेत नव्हते. त्यांनी उलट ब्रजेशला गप्प करण्याचा प्रयत्न केला. अखेर काहीतरी बहाणा करत ब्रजेशच तिथून सटकला. त्यानं वरिष्ठ डॉक्टरांना सगळा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close