क्राइम

या कारणाने वडिलांनी प्रसिद्ध टेनिसपटू मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार ब्युरो 

                सोशल मीडियावर रिल बनवून टाकण्यासाठी अनेक लोक आपला जीव धोक्यात टाकतात. काही लोक तर जीव गमावतात. पण रील बनवुन ती सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या मुलीवर वडिलांनी गोळ्या झाडून तिचा खून केला आहे. राधिका यादव असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून ती प्रसिद्ध टेनिसपटू होती. ती आपली अकॅडमी देखील चालवायची. घटना गुरुग्राम मध्ये घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय राधिका यादव हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलिसांनी सांगितले की, राधिक यादव ही सुशांत लोक फेज-2 मध्ये राहत होती. राधिकाने सोशल मीडियावर रील्स बनवल्यामुळे तिचे वडील नाराज होते. त्यामुळे त्यांनीच आपल्या मुलीवर पाच गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या राधिकाला लागल्या. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या राधिकाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान राधिकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी राधिकाच्या वडिलांना अटक केली आहे. तसेच रिव्हॉल्व्हर देखील जप्त करण्यात आली आहे.

राधिका यादव ही राज्यस्तरीय टेनिस जगतातील एक प्रसिद्ध खेळाडू होती. ती लॉन टेनिल खेळायची आणि तिने अनेक पदके जिंकली होती. तसेच राधिका यादव ही एक टेनिस अकादमी देखील चालवत होती. जिथे ती इतर खेळाडूंना प्रशिक्षण देत होती. याशिवाय राधिकाने विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तिने विश्वनाथ हर्षिनी, बोग्राट मेयलिस, सन यिफान, मारुरी सुहिता आणि मशाबायेवा दिलनाझ सारख्या खेळाडूंविरुद्ध सामने खेळले होते.

एका वेबसाइटनुसार, राधिका यादवचा जन्म 23 मार्च 2000 रोजी झाला होता आणि ती आयटीएफ दुहेरी क्रमवारीत पहिल्या 200 खेळाडूंमध्ये होती. दुहेरी टेनिस खेळाडू म्हणून तिची आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (ITF) ची क्रमवारी 113 होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close