Uncategorized
सहा लाख रुपयांची लाच स्वीकारतांना मुख्याधिकाऱ्यास अटक

जळगाव /नवप्रहार ब्युरो
दोन कोटी रुपयांचे बिल काढण्यासाठी 12 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या माजलगाव येथील मुख्याधिकाऱ्यास काचेच्या रकमेपैकी सहा लाख रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी चव्हाण याच्या घरी करण्यात आली
माजलगाव शहरामध्ये नगरोत्थान योजने अंतर्गत विकासकामे सुरु आहेत. तक्रारदार कंत्राटदाराने माजलगावमध्ये केलेल्या सिमेंट रस्त्याचे दोन कोटी रुपयांचे बील काढण्यासाठी सहा लाख तसेच उर्वरित कामातील रस्त्याच्या बाजुचे अतिक्रमण काढून अडथळे दूर करुन देण्यासाठी सहा लाख अशा बारा लाख रुपयांच्या लाचेची मागणी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याने केली होती.
याबाबतची तक्रार संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी तक्रारदार व पंच यांच्या समक्ष चंद्रकांत चव्हाण याने बारा लाख रुपये लाचेची मागणी केली. यातील सहा लाख रुपये गुरुवारी व उर्वरित सहा लाख शुक्रवारी (दि.11) रोजी देण्याचे ठरले होते. त्यानुसार चंद्रकांत चव्हाण याच्या माजलगाव शहरातील पिताजी नगरी भागातील घरी तक्रारदार सहा लाख रुपये घेवून गेले, त्यावेळी चव्हाण याने हे सहा लाख रुपये स्विकारताच त्याला लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधिक्षक माधुरी केदार-कांगणे , प्रभारी अपर पोलिस अधिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अशोक नागरगोजे, राजेंद्र सिनकर यांनी केली.
घराची झडती सुरु
चव्हाण याने सहा लाख रुपये लाच घेताना कारवाई करण्यात आल्यानंतर त्याच्या माजलगाव येथील तसेच जामखेड येथील घरावरही छापा टाकत तपासणी करण्यात येत आहे. यामध्येही मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ही कारवाई पूर्ण झाल्यानंतरच यामध्ये काय काय हाती लागले, हे समोर येऊ शकणार आहे. घराच्या झडतीची कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरु होती.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!