क्राइम

महामार्गाच्या बाजूला मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला अटक

Spread the love

महिले सोबत या तीन पुरुषांना ठोकल्या बेड्या 

पुणे /नवप्रहार ब्युरो 

            परप्रांतीय मुलींकडून मुंबई -बंगलोर महामार्गालगत देहव्यापार करवून घेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या कामात तिला मदत करणाऱ्या तीन साथीदारांना देखील बेड्या ठोकल्या आहेत.

अटक केलेली महिला ही ३६ वर्षीय असून ती मूळची खडकी (ता.तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील आहे. ती व तिच्या इतर ३ साथीदारांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे  पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना माहिती मिळाली की, ३६ वर्षीय महिला एजंट ही मुलींचे फोटो पाठवून वेश्यागमनासाठी रक्कम ठरवून ग्राहकांना मुली ठरविलेल्या ठिकाणी पाठविते व ते वेश्यागमनाकरीता आलेल्या ग्राहकाकडून ४ हजार रुपये मुलीमार्फत अथवा तिचे साथीदाराकडून पैसे स्वीकारते. ही महिला सिंहगड रोड भागात ग्राहकांच्या मागणीनुसार एका हॉटेलमध्ये मुली पुरवित व ती वेश्या व्यवसाय चालविते, अशी बातमी होती. या बातमीनुसार, पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून एका परराज्यातील महिलेची सुटका केली. एजंट महिलेला अटक केली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तिच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, सचिन माळवे, संदिप शिर्के, विपुन गायकवाड, सुहास डोंगरे, दयानंद तेलंगे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, स्वप्नील मिसाळ यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close