क्राइम
पाचोरा हादरले भरदिवसा बस स्टँड वर गोळीबार ,तरुणावर केले बारा राऊंड फायर

धाड…धाड….धाड…बारा राऊंड फायर आणि तरुणाच्या शरीराची चाळण
वाळू व्यवसायातील वाद की स्टेटस काय आहे कारण ?
जळगाव / नवप्रहार ब्युरो
भरदिवसा झालेल्या गोळीबाराने पाचोरा बसस्थानक हादरले. दुचाकीवर बसून आलेल्या.दोन तरुणांनी उभ्या असलेल्या तरुणावर जवळ असलेल्या देशी कट्ट्यातून बारा राऊंड फायर करत त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण केली. मृत तरुणाचे नाव आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे असून, घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृताच्या शरीरावर इतक्या गोळ्या घालण्यात आल्या की त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली. ही घटना वाळू व्यवसायाच्या वादातून घडली अथवा मृत तरुणाने ठेवलेले स्टेटस त्यासाठी कारणीभूत आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
या थरारक घटनेच्या मुळाशी वाळू व्यवसायातील वाद, वर्चस्व संघर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र सोशल मीडियावरच्या स्टेटस, रील्स आणि त्यातून निर्माण झालेली वैरभावना यांचाही तपास सुरू आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल डिटेल्स व सोशल मीडिया पोस्ट यावर सखोल तपास केला जात आहे. पाचोरा शहरात या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडवली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाळू व्यवसायातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत तरुणाचे नाव आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे असून, घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृताच्या शरीरावर इतक्या गोळ्या घालण्यात आल्या की त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली.
आकाशने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ठेवलेली रील ठरली हत्येचं कारण?
हत्या झालेल्या आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात तो म्हणतो – “शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही थेट छातीवर मारतो, रोख ठोक. जिस दिन मारुंगा छाती पे मारुंगा, या स्टेटसनंतर काहीच तासांत हा जीवघेणा हल्ला झाल्याने ही हत्या वर्चस्ववादातून झाली का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1
1