Uncategorized

नकली नोटा बनणाऱ्या टोळीचा राहुरी पोलिसांनी केला पर्दाफाश 

Spread the love

गोपनीय माहितीच्या आधारावर झाली कारवाई 

राहुरी  /प्रतिनिधी

          झटपट श्रीमंत होण्यासाठी लोक गैर मार्गाचा उपयोग करतात. ह्यात ड्रग्स सप्लाय, सोने तस्करी , दारू तस्करी, गुटका तस्करी सोबत बनावट नोटा चलनात आणण्याचा समावेश आहे. राहुरी पोलिसांनी बनावट नोटा बनविणाऱ्या रॅकेट चा पर्दाफाश करत ७० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. .

राहुरीत बनावट नोटांचा सापडल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २८ जून रोजी रात्री  ९.३० वाजता राहुरी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की काही संशयित व्यक्ती होंडा शाईन दुचाकी नंबर एम एच ४५ वाय ४८३३ ही मोटरसायकल घेऊन अहिल्यानगरकडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा बाळगून येत आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुरी शहरातील संत गाडगेबाबा विद्यालय समोर सापळा लावला.

संशयित इसम पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार, वय ३३ वर्ष, राहणार सोलापूर; राजेंद्र कोंडीबा चौगुले, वय ४२ वर्ष, राहणार कर्जत जिल्हा, अहिल्यानगर; तात्या विश्वनाथ हजारे, वय ४० वर्ष, राहणार पाटेगाव, तालुका कर्जत, यांना ताब्यात घेऊन दोन शासकीय पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या आहेत. पोलीस निरीक्षक यांनी लगेच ॲक्सिस बँक मॅनेजर कैलास वाणी यांना बोलावून सदर नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आम्ही बनावट नोटा तयार करतो ते ठिकाण दाखवतो असे सांगितले. पोलीस निरीक्षक यांनी सदर ठिकाणी पोलिस पथक रवाना केले. शितल नगर टेंभुर्णी येथे समाधान गुरव यांच्या इमारतीत आरोपीने भाड्याने घर घेतलेले असून तेथे झेरॉक्स मशीन, प्रिंटर, नोटा बनवण्यासाठीचा कागद, नोटा मोजण्याची मशीन, लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिट अशी पाच लाख किमतीची मशिनरी, तसेच पाचशे रुपये, दोनशे रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा असा एकूण ७० लाख ७३ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्दे मला जप्त केला आहे.

आरोपींवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या पथकाने केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close