Uncategorized

प्रीवेडिंग शूट दरम्यान कपल सोबत घडले भयंकर

Spread the love

कपल होतोय सोशल मीडियावर ट्रोल 

            आपले लग्न इतरांपेक्षा हटके असावं असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी तो स्वतः आणि मित्रांकडून नवनवीन कल्पना घेत असतो. अश्यातच आता प्री वेडिंग सूट चा जमाना आलाय. प्री वेडिंग सूट मध्ये तर कपल हद्द पार करताना दिसत आहेत. अशा शूट या वेळी काही अपघातही घडले आहेत. असे असताना देखील हा ट्रेंड कपल मध्ये खूप लोकप्रिय होत आहे. पण प्री वेडिंग शूट मुळे एका कपल वर सोशल मीडियावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

अनेकदा प्री-वेडिंग शूटच्या या भन्नाट कल्पनाच कपलच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळतेय. आत्तापर्यंत डोंगर- दरी, किल्ले, नदी- समुद्र किनारी किंवा गार्डन- पार्कमधील प्री-वेडिंग शूटचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण एका कपलने चक्क ५०० ते ६०० फूट खोल दरी स्पेस नेटवर बसून प्री- वेडिंग शूट केलयं. इथे जरीशीही चूक झाली असती तर दोघांचाही मृत्यू निश्चित होता, पण तरीही जीव धोक्यात घालून कपलने हे प्री-वेडिंग शूट पूर्ण केलयं. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोल केलं जातयं.

दोन बाजूला डोंगराचे सुळके त्यामध्ये ५०० ते ६०० फूट खोल दरी, या दरीवर स्पेस नेट बांधून त्यावर कपलचं प्री-वेडिंग शूट करण्यात आलं. त्यामुळे अनेकांनी आता प्री- वेडिंग शूट कोणत्या थराला जाऊन पोहोचयं? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण प्री-वेडिंगचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

रॉक क्यायंबर, स्लॅक क्लायनर ओंकार पडवळ यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा प्री-वेडिंग व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो लोणावळ्यातील ड्यूक नोस या ठिकाणच्या खोल दरीत शूट करण्यात आला आहे, दोन डोंगराच्या मधील ५०० ते ६०० फूट खोल दरीत स्पेस नेट लावली आहे. ज्यावर बसून आणि उभं राहून विविध पोज देत कपलने अॅडव्हेंचर प्री- वेडिंग शूट केलयं.

व्हिडीओच्या सुरुवातीला ओंकार पडवळ सांगतोय की, आज आपण स्पेस नेटवर फोटोशूट करतोय. मी मागच्या ८ वर्षांपासून अॅडव्हेंचर स्पोर्ट्स करतोय, आता मी लग्न करतोय, माझी होणारी पत्नी या फिल्डमधील नाही, तिला मी या स्पोर्ट्सची ओळख करुन देतोय…. यानंतर बॅकग्राउंडला टिक टिक वाजते डोक्यात गाणं वाजतं आणि चित्त थरारक साहसी व्हिडीओ समोर येतो. यात नेटवर ओंकारची पार्टनर बसलेली दिसतेय, तर ओंकार दोरीवर  चालत साहसी खेळ करत तिच्याजवळ पोहोचताना दिसतोय.

 

 

 

 

दरम्यान या प्री- वेडिंग व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण या कपलचं कौतुक करत आहेत, तर काहींनी त्यांच्या धाडसाला सलाम केलयं, एका युजरने लिहिले की, ताई यायला तयार झाल्या यातचं प्रेम दिसून येतं. दुसऱ्याने लिहिले की, तुमच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे. तर तिसऱ्या एकाने म्हटले की, पार्टनरला स्पोर्ट्सची ओळख करुन देण्याचा हा पॅर्टन जरा वेगळाच आहे.

त्याचबरोबर काहींनी या प्री- वेडिंग शूटवरुन कपलला चांगलचं ट्रोल देखील केलयं. एकाने लिहिले की, प्री- वेडिंग नव्हे ही ##गिरी आहे. दुसऱ्या एकाने लिहिले की राहायचं बाजूला अन् दोघांचं तेरावा करायला यायला लागायचं. तिसऱ्या एकाने सवाल केला की, हेल्मेट नाही घातले, शूज नाही घातले, कोणी तुमचे बघून केले तर?.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close