गडचिरोली जिल्ह्यातून पहिल्यांदाच कब विभागातील 12 विद्यार्थी राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणीत यशस्वी
गडचिरोली/ प्रतिनिधी
दिनांक 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 या कालावधीत महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् अॅण्ड गाईडस् अंतर्गत पार पडलेल्या राज्यस्तरीय चतुर्थ चरण कब चाचणी परीक्षा 2024-25 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पी एम. श्री. छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडसा जुनी, ता. देसाईगंज येथील इयत्ता 2 ते 4 चे 12 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
ही यशस्वी कामगिरी गडचिरोली जिल्ह्यातून प्रथमच नोंदविण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना कब मास्तर श्री. खेमराज नारायण तिघरे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.
—
यशस्वी विद्यार्थ्यांची यादी (शाळा –पी एम श्री छ.शिवाजी महाराज न.प. उ. प्रा. शाळा, वडसा जुनी, ता. देसाईगंज):
क्र. विद्यार्थी नाव प्रमाणपत्र क्रमांक
1 शौर्य उज्वल बोदेले. 316
2 आशिष अतुल ढोरे 317
3 मेघनाथ ईश्वर ठाकरे 318
4 गणेश सचिन तरारे 319
5. सुयोग सुभाष मेश्राम. 320
6 सारंग प्रमोद समर्थ. 321
7 फाल्गुन लिनेश खरकाटे 322
8 उत्कर्ष दादाजी चौधरी 323
9 नयन जयपाल ढोरे 324
10 चैतन्य व्यंकट बघमारे 325
11 विकल्प विक्की बोदेले 326
12 हर्षल देवेंद्र राऊत. 327
या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल गडचिरोली भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालय यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक व कब मास्तर श्री. खेमराज तिघरे व श्री. शिवराम हाके सहाय्यक कब मास्टर तसेच सर्व यशस्वी चिमुकल्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
—