क्राइम

या कारणाने होतेय महिला अधिकाऱ्याची सोशल मिडिया वर चर्चा

Spread the love

उत्तरप्रदेश /. नवप्रहार ब्युरो 

              अलीकडे महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशातील असे एकही राज्य नाही जेथे महिलांवर अत्याचार होत नाहीत. देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा आकडा पाहता आरोपींना कायद्याचे कुठलेही भय राहिले नसल्याचे समोर येत आहे.

                उत्तरप्रदेश मध्ये बलात्काराच्या आरोपीवर गोळी झाडणाऱ्या महिला अधिकाऱ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

           उपलब्ध माहिती नुसार पोलिसांनी ४ वर्षाच्या बालिकेला आपल्या विकृत मानसिकतेचा बळी बनवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान आरोपीने पोलिसाशी हुज्जत घालून त्यांच्यावर शस्त्र उगारले. प्रत्युत्तरादाखल महिला अधिकाऱ्याने त्याच्यावर गोळी झाडली. त्यात आरोपी जखमी झाला आहे.

           यानंतर आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले आहे..उयायलयाने त्याला पीसीआर दिला आहे. आरोपी जवळ शस्त्र आले कुठून याचा पोलिस तपास करणार आहेत.

   

.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close