युक्रेन ने केलेल्या ड्रोन हल्ल्यात रशियाचे जबरदस्त नुकसान

रशियात घुसून केला हा हल्ला
मागील तीन वर्षांपेक्षा जात कालावधीपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे.या दोन देशात सुरू असलेल्या भीषण युद्धामध्ये १ जून २०२५ ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरली. या दिवशी युक्रेनने रशियाच्या अंतर्भागात हजारो किलोमीटर आत घुसून केलेल्या ड्रोन हल्ल्यात रशियाचं जबर नुकसान झालं. मी
या हल्ल्यात रशियाची अनेक लढाऊ विमानं नष्ट झाली. ऑपरेशन स्पायडर वेब असं नाव दिलेल्या या मोहिमेच्या माध्यमातून केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे रशियाचं तब्बल ७ अब्ज डॉलर एवढं नुकसान झालं, असा दावा युक्रेनने केला आहे. तसेच या हल्ल्यासाठी आपले स्वस्तातले केवळ ११७ ड्रोन कामी आले, असेही रशियाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जेव्हापासून रशियावर हा हल्ला झाला आहे. तेव्हापासून या अत्यंत खतरनाक आणि हायटेक हल्ल्यामागचा मास्टरमाइंड कोण आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. या हल्ल्याची तयारी मागच्या दीड वर्षापासून सुरू होती. तसेच सर्वकाही विचारपूर्वक करण्यात आले, असा दावा युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केला आहे. आता एका रशियन युद्ध ब्लॉगरने असं काही सांगितलं आहे, ज्याबाबत ऐकून संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. या ब्लॉगरने केलेल्या दाव्यानुसार या संपूर्ण ऑपरेशनचा मास्टर माईंड युक्रेनमधील ३७ वर्षीय एक्स डीजे आहे.
द सनच्या रिपोर्टनुसार रशियन युद्ध ब्लॉगर्सने या ऑपरेशनच्या मागे युक्रेनमधील एक ३७ वर्षीय एक्स डीजे आर्टेम टिमोफिव्ह असल्याचा दावा केला आहे. या ब्लॉगरने केलेल्या दाव्यानुसार आर्टेमने लाकडाच्या चौकटी असलेल्या घरांना नेण्याचा बहाणा करून रशियामध्ये घुसवलेल्या टकांमध्ये ड्रोन लपवले होते. या कटामध्ये आर्टेम याची पत्नी एकातेरिना टिमेफीव्हा हीसुद्धा सहभागी होती, असेही या ब्लॉगर्सने म्हटले आहे.
आर्टेम काही वर्षांपूर्वीच रशियातील चेल्याबिंस्क शहरात स्थायिक झाला होता. तसेच त्याने तिथे ट्रान्सपोर्टेशनचं काम सुरू केलं होतं. त्याचं हे काम हल्ल्यासाठी उपयुक्त ठरलं. तर आर्टेमची पत्नी स्वत:ची ओळख ही जादुगार म्हणून करून देते. तसेच बी ग्रेड कादंबऱ्या लिहिते.
दरम्यान, रशियाला मुळापासून हादरवून टाकणारा हल्ला करणारी योजना युक्रेनची गुप्तचर संस्था एसयूबीने दीड वर्षांपासून रणनीती आखून तयार केली होती. हा हल्ला करण्यासाठी कंटेनरमध्ये लपवून ड्रोन रशियाच्या सीमा ओलांडून हवाई तळांपर्यंत नेण्यात आले. हवाई तळांजवळ गेल्यावर कंटेनरचं छड रिमोटद्वारे उघडण्यात आलं. त्यानंतर या ड्रोननी उड्डाण करून बेलाया, ड्यागिलेवो, इव्हानोव्हो आणि ओलेन्या गया हवाई तळांवर उभ्या असलेल्या विमानांवर हल्ला केला. दरम्यान, या सर्वाचं कमांड सेंटर हे रशियाची गुप्तचर संस्था एफएसबीच्या कार्यालयाजवळच होते, असा दावा युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे.
हल्ला झाला तेव्हा कंटेनर्समधून ड्रोन बाहेर पडून विमानतळांच्या दिशेने जाऊ लागल्याचे पाहताच रशियाचे नागरिक अवाक् झाले. या ड्रोन्सनी रशियाच्या लढाऊ विमानांवर अचूक हल्ले केले. त्यात रशियाची टीयू-९५ आणि टीयू-२२ यासारखी लढाऊ विमानंही लक्ष्य झाली. रशियन सैनिकांनी अँटी ड्रोन बंदुकांच्या माध्यमातून या ड्रोन्सनां लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र या ड्रोन्सची संख्या प्रचंड असल्याने ते त्यांना रोखू शकले नाहीत.
रशियन ब्लॉगरने आर्टेम याचं नाव दहशतवादी हल्ल्याशी जोडलं आहे. तसेच त्याच्या नावावर चार ट्रकची नोंदणी झालेली होती, असेही सांगितले. दरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले सर्व लोक सुरक्षितपणे रशियामधून बाहेर पडल्याचे सांगितले. तर रशियन अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नसल्याचे स्पष्ट केलं आहे.