शिवभोजन केंद्राची चौकशी करण्याची मागणी
नांदेड ( जि.प्र.)
शिवभोजन केंद्रात बोगस लाभार्थी दाखवून मोठ्या प्रमाणात केंद्रचालक भष्टाचार करत आहेत. शिवभोजन केंद्राची चौकशी करून केंद्र चालकावर कारवाई करण्याची मागणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य महानगराध्यक्ष नकूल जैन यांनी अन्न नागरी पुरवठा, राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य सरकारने सर्व सामान्य व गोरगरीब नागरिकांसाठी शिवभोजन केंद्र सुरू केले आहे. पण शिवभोजन केंद्रात भष्टाचार होत आहे. बोगस लाभार्थी दाखवून बिले उचलण्यात येत आहेत. असे अनेक बोगस बिले नांदेड जिल्ह्यात उचलण्यात आली आहेत. असा प्रकार राज्यात सुरू आहे.
अनेक शिवभोजन चालक राज्य शासनाच्या नियम व अटीनुसार नागरिकांना सुविधा देत नाहीत. अनेक ठिकाणी निकृष्ट भोजन दिले जाते. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे पण लावले जात नाहीत.काही शिवभोजन केंद्र बंद आहेत. पण त्यांचे बिले बनवून मंजूर केले जातात. यात लाखो रुपयांचा भष्टाचार होतो, असाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
पुरवठा विभागामध्ये काही शासकीय व निमशासकीय अधिकारी देखील शिवभोजनालयाचे बिल काढण्यासाठी आर्थिक तडजोड करत असल्याची दब क्या आवाजात सध्या चर्चा चालू आहे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील का