ट्रक मधून उडालेल्या टिनाच्या पत्र्याने तरुणाचे शिर केले धडावेगळे

अपघात हा कधीही , कुठेही आणि कसाही होऊ शकतो हे जरी खरे असले तरी अपघात घडू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. पण काही वेळा आपण खबरदारी घेतो.परंतु समोरचा घेत नसल्याने अपघात घडतात आणि त्यात चूक नसतांना देखील बेकसुर लोकांना जीव गमवावा लागतो.
वाळू ची वाहतूक करताना वाळू ची वाहतूक करणाऱ्या वाहनाने त्याला कापडाने झाकावे. कारण या वाहनाच्या मागे धावत असलेल्या दुचाकी स्वतःच्या डोळ्यात अनावधानाने वाळू गेल्यास अपघात होऊ शकतो. असा नियम असताना सुद्धा कोणीच या नियमांचे पालन करत नाही. हाच नियम कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी देखील लागू आहे. पण नियमांचे पालन करतील ते भारतीय कुठले ?
वाहनात सामान भरताना ते रस्त्यात पडू नये यासाठी त्याला दोरीने घट्ट बांधणे आवश्यक आहे. पण जवळपास जायचे असल्यास वाहन धारक ती काळजी घेत नाही. वाहन धारकाच्या अश्याच निष्काळजी पणामुळे एका तरुणाचा नाहक जीव गेला आहे.
तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये अशी घटना घडली आहे. या व्हिडीओवरुन कधी काय होईल याचा नेम नाही हे लक्षात येत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर फारशी वाहनांची वर्दळ दिसत नाहीये. फक्त एकच बाईक चालक सुरुवातीला दिसतो. यानंतर पत्र्यांनी भरलेला एक ट्रक भरधाव वेगात रस्त्यावर येतो आणि त्यातला एक पत्रा उडून थेट बाईक स्वारकडे जातो. यावेळी हा पत्रा इतक्या जोरात फेकला जातो की थेट बाईकवर असलेल्या व्यक्तीची मान धडावेगळी होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीनं हेल्मेटही घातलेलं आहे मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. अतिशय भयंकर असा अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ bhagat_singh.raj नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही व्हिडीओवर कमेंट करत आहेत, एकानं म्हंटलंय सगळी चूक ट्रक ड्रायव्हरची आहे त्याच्यावर कारवाई करा” दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिलीय “दुसऱ्याच्या चुकीमुळे जीव गेला”