त्या महाकाय प्राण्याचा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

ज्याने व्यापून टाकले आहे नदीचे अर्धे पात्र
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आल्यापासून जंगली आणि इतर प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने जनतेसाठी ते कुतूहलाचा विषय ठरत आलेला आहे. असे व्हिडिओ युजर्स कडून अनेकवेळा बघितले जातात. असाच एका महाकाय प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक लोकांनी तो पाहून त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होतात. इथे पशु-प्राण्यांचेही व्हिडिओ शेअर केले जातात. प्राण्यांचे जीवन पाहणे मनोरंजक ठरते, ज्यामुळे कमी वेळातच लोक अशा या व्हिडिओजना पसंत करतात. मात्र आता इथे जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो सर्वांनां हादरवून सोडत आहे. व्हिडिओतील थरार दृश्ये इतकी भयानक आहेत की लोकांना त्यावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.
काय दिसले व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक विशालकाय प्राणी आराम करत असल्याचे दिसून आले. हा प्राण्याचे शरीर इतके मोठे होते की त्याने अर्ध्या नदीला व्यापून घेतले. पहिल्यांदा याला पाहताच हा नक्की कोणता प्राणी आहे असा प्रश्न पडतो मात्र पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर याचे शरीर काहीसे मगरीसारखे जाणवू लागते. मात्र ही काही साधी सुधी मगर नसून तिचे हे भयानक रूप सर्वांनाच आश्चर्यचकीत करते. लोकांना याकडे पाहून हा जिवंत राक्षस असल्याचा भास होतो.
व्हिडिओमध्ये दिसणारी मगर इतकी मोठी असते की तिची शेपटी माणसाच्या उंचीपेक्षा लांब आहे. त्याचे शरीर इतके जड आहे की ते हत्तीलाही ते मागे टाकू शकते. त्याचे भयानक डोळे, काटेरी शेपटी आणि दगडासारखे कडक शरीर पाहून, कमकुवत मनाचे लोक भीतीने थरथर कापू शकतात. पाण्यात विश्रांती घेणारी ही मगर खूप धोकादायक दिसते.
दरम्यान व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, त्याने खाऱ्या पाण्यातील मगरीचे जवळून चित्रीकरण करण्यासाठी एका लांब काठीवर एक छोटा कॅमेरा बसवला होता. यामुळे त्याला मगरीला त्रास न देता किंवा स्वतःचा जीव धोक्यात न घालता फुटेज टिपता आले. तो म्हणाला की हा अनुभव त्याच्या विचारापेक्षा चांगला होता. त्याला भविष्यातही अशा धोकादायक प्राण्यांचे फुटेज जगासमोर आणायचे आहेत आणि हा व्हिडिओ फक्त त्याची सुरुवात आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @wildmanadventures नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एकाने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे, “ते मेले आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पकडले न जाता तुम्ही हे कसे शूट केले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.