क्राइम

हत्या करून आत्महत्या दर्शविण्याचा प्रयत्न ; पोलीस तपासात बिंग फुटले

Spread the love
सालेम (तामिळनाडू )/ नवप्रहार डेस्क
             तामिळनाडू च्या सालेम मधून एक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका प्रियकराने आपल्या दोन मैत्रिणी सह तिच्या प्रेयसीला विष पाजून डोंगरावरून ढकलून दिले. त्यांचा या घटनेला आत्महत्या दर्शविण्याचा प्रयत्न होता. पण पोलिसांच्या तापसापुढे सत्यता बाहेर आलीच.
सालेम जिल्ह्यातील एका दरीत ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आधी त्या महिलेनं स्वत: जीवन संपवल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली अन् धक्कादायक मोहिती समोर आली

नेमकं घटना काय घडली?

एका ३५ वर्षीय महिलेला तिच्या प्रियकर आणि त्याच्या दोन मैत्रिणींनी विष देऊन दरीत फेकून दिल्याचा आरोप करण्यात आला होता. पण तो प्रियकर आणि त्याच्या दोन मैत्रिणींनी संबंधित महिलेने स्वत: जीवन संपवल्याची कहाणी तयार केली होती. पण आता पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून तिघांना अटक केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये काम करणारी आणि वसतिगृहात राहणारी एक महिला १ मार्चपासून बेपत्ता झाल्याची घटना घडली. ती बेपत्ता झाल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. पोलिसांनी तपास केल्यानंतर तिच्या कॉल रेकॉर्डवरून असं दिसून आलं की ती शेवटची अब्दुल अबीज नावाच्या एका २२ वर्षीय तरुणाशी संपर्कात होती. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी केली आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

तेव्हा पोलिसांना चौकशीतून असं आढळून आलं की ती महिला अब्दुलबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तसेच ती येरकॉड येथे त्याला भेटण्यासाठी देखील गेली होती. मात्र, अब्दुलने आधीच त्याच्या इतर दोन मैत्रिणींनी मिळून त्या महिलेला संपवण्याचा कट रचला होता. माध्यमांतील वृत्तानुसार, लोगानायागी असं त्या महिलेचं नाव होतं. ही महिला अब्दुलबरोबर असलेले संबंध तोडण्यास तयार नव्हती. तसेच तिने इस्लाम धर्म स्वीकारून तिचे नाव अल्बिया ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण अब्दुल आधीच दुसऱ्या दोन महिलेंबरोबर रिलेशनशिपमध्ये होता.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अब्दुल आणि त्याच्या दोन मैत्रिणी अशा तिघांनी येरकॉडमध्ये त्या महिलेला भेटायला बोलावलं.त्यानंतर त्यांनी तिला विष देऊन बेशुद्ध केलं. बेशुद्ध झाल्यानंतर तिला ३० फूट खोल दरीत फेकून दिलं. हा सर्व प्रकार त्या महिलेने आत्महत्या केली असल्याचं भासवण्यात आलं. मात्र, पोलिसांना या संपूर्ण प्रकरणात संशय आला आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर येरकॉड पोलिसांनी अब्दुल आणि त्याच्या दोन दोन मैत्रिणी अशा तिघांना अटक केली. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close