क्राइम

ते दोघे गप्पा मारत निवांत बसले होते, पण क्षणात त्याने खिशातील चाकू काढला आणि बायकोचा गळा कापला

Spread the love

सांगली / प्रतिनिधी

                     ते दोघे नवरा बायको,सरकारी घाटावर फिरायला आले होते. त्यांच्यात छान गप्पा गोष्टी देखील रंगल्या होत्या. इतक्यात दोघात काय बिनसले कोणास ठाऊक त्याने खिशातून चाकू काढला आणि तिचा गळा कापला. यात तिचा मृत्यू झाला. आरोपी पती पत्नीला घेऊन सरकारी घाटावर फिरायला आला होता.

इथं घाटावर बसून त्याने काही वेळ गप्पा मारल्या. यानंतर अचानक पतीने खिशातील चाकू काढून पत्नीचा गळा चिरला आहे. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रियांका जाकाप्पा चव्हाण असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर जाक्काप्पा सोमनाथ चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. आरोपी जाक्कापा हा आधी कर्नाटकातील बबळेश्वर काकटगी इथं राहत होता. तर त्याची पत्नी प्रियांका ही आपल्या आईसोबत सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी इथं राहत होते. घटनेच्या दिवशी रविवारी रात्री आठ वाजता दोघंही सांगलीच्या सरकारी घाट परिसरात फिरायला गेले होते.

काही वेळ दोघांनी नदीच्या तिरावर बसून गप्पा मारल्या. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. अचानक दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी पत्नी खिशातून आणलेला चाकू बाहेर काढला आणि काहीही कळायच्या आत पत्नीच्या गळ्यावर वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की पुढच्याच क्षणात पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी जाकाप्पा घटनास्थळावरून पळून गेला.

या घटनेची माहिती मिळताच सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे, मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत प्रियांका यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येसह विविध कलमांतर्गत पतीवर गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासानुसार, ही हत्या कौटुंबीक कारणातून झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून पत्नी आपल्या आईसोबत सांगलीवाडी इथं राहत होती. तसेच ती सांगलीतल्या एका साडीच्या दुकानात काम करत होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close