मुंडगाव येथे माती परीक्षण प्रात्यक्षिक कार्यक्रम

योगेश मेहरे
अकोट
बेटर कॉटन, कॉटन कनेक्ट व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या अंतर्गत चालू असलेला उत्तम कापूस प्रकल्प अकोट तालुक्यातील बेटर कॉटन प्रोजेक्ट अंतर्गत मुंडगाव गावामध्ये रॅपिड किटच्या माध्यमाने माती परीक्षण प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी क्षेत्र प्रवर्तक – प्रांजली इंगळे आणि सागर सिरसाट यांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व व त्याचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली .प्रांजली इंगळे यांनी
शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण जाणून घेऊन कापूस पिकांच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याकरता माती परीक्षण करूनच त्यानुसार खताचा वापर करणे आवश्यक आहे.जमीन सुपीक असेल तर जमिनीची उत्पादन क्षमता चांगली असते ते जाणून घेण्यासाठी माती परीक्षण अत्यावश्यक आहे, याविषयी माहिती दिली.सागर सिरसाट यांनी मातीच्या नमुनानुसार रॅपिड माती परीक्षण किटच्या साह्याने माती परीक्षण करून दाखवले त्यामध्ये सेंद्रिय कर्ब, जमिनीच्या सामु व नत्र स्फुरद,पालाश, या पाच घटकांचे माती परीक्षण करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना शेतातील मातीचा नमुना कसा घ्यावा यावर माहिती दिली, व मातीच्या नमुना नुसार खत व्यवस्थापन कसे करावे यावर संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आले. यावेळी मुंडगाव गावातील शेतकरी उपस्थित होते व तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली इंगळे व आभार क्षेत्र प्रवर्तक सागर सिरसाट यांनी केले.