हटके

मागील ५ वर्षांपासून टीटीई म्हणून वावरणाऱ्या तोतया महिला टीसी चा भांडाफोड 

Spread the love

लखनऊ / नवप्रहार ब्युरो

                   तोतया गिरी करण्यात फक्त पुरुषच समोर असतात असे नाही तर आता महिला सुद्धा तोतयागिरी करीत असल्याचे काही प्रकरणावरून समोर येत आहे. लखनऊच्या चारबाग स्टेशनवर देखील अशीच एकं घटना समोर आली आहे. येथे मागील ५ वर्षांपासून टीटीई म्हणून वावरणाऱ्या एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

पाच वर्षांपासून तिकीट चेक करणारी महिला टीटीई नसल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सरकारी कर्मचारी असल्याचं भासवून या महिलेने रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासली.

लखनऊच्या चारबाग स्टेशनवर बऱ्याच काळापासून ही महिला टीटीई म्हणून वावरत होती. टीटीईचा ड्रेस आणि गळ्यात बनावट आयकार्ड घालून महिला वेटिंग रूममध्ये तिकीट चेक करायची. ही गोष्ट स्टेशन मास्तरच्या लक्षात येताच जीआरपीने लगेचच कारवाई केली आणि महिलेची चौकशी करायला सुरूवात केली. महिलेचं आयकार्ड चेक करताच सगळं सत्य समोर आलं, त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली.

ही महिला टीटीईच्या ड्रेसमध्ये प्रवाशांची तिकीट तपासायची. तिकीट नसलेली व्यक्ती वेटिंग रूममध्ये असेल तर महिला दंड आकारायची. खऱ्याखुऱ्या टीटीई दिसण्यासाठी महिलेने टीटीईचा युनिफॉर्मही शिवून घेतला होता. तसंच आयकार्ड घेऊनही महिला फिरायची. पोलिसांनी आयकार्डचा नंबर तपासला तेव्हा महिला पाच वर्षांपासून चारबाग रेल्वे स्टेशनवर तैनात असल्याचं समोर आलं.

ज्या आयडीच्या आधारावर महिला पाच वर्ष रेल्वे स्टेशनवर काम करत होती, ते आयडीही बनावट होतं. याप्रकरणी पोलिसांनी भदोहीची रहिवासी काजल सरोजला अटक केली आहे. महिला फक्त स्टेशनवरच लोकांची तिकीटं तपासायची, ज्यात प्लॅटफॉर्म तिकीटाचा समावेश होता. ज्यांच्याकडे तिकीट नसायचं, त्यांच्याकडून काजल दंड म्हणून पैसे घ्यायची. हे पैसे थेट काजलच्या खिश्यामध्ये जायचे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close