त्याची दुसरी पत्नी रहायची नेहमी आजारी सत्य समजल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली

या तीन मुलांच्या पित्याने पोलिसांकडे मदत मागितली आहे. मला आणि माझ्या मुलांना धमक्या मिळत आहेत असं त्याने पोलिसांना सांगितलं. जिच्यासोबत दुसरं लग्न केलं, तिच्या परिवाराकडून धमक्या दिल्या जात आहेत, असं त्याने सांगितलं. पोलिसांनी हे सर्व प्रकरण ऐकून घेतल्यानंतर ते सुद्धा स्तब्ध झाले. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. या प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीने सांगितलं की, साहेब माझ्या पहिल्या पत्नीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. मला तीन मुंल आहेत. त्यांच्या पालनपोषणासाठी मी 2024 साली एक विधवेसोबत दुसरं लग्न केलं. तिला तिच्या पहिल्या पतीपासून दोन मुलं होती. आमचा मधुचंद्र झाल्यानंतर पत्नी सतत आजारी राहू लागली. मी तिच्यावर अनेक ठिकाणी उपचार केले. त्यावेळी मला समजलं की, माझ्या दुसऱ्या पत्नीला एड्स आहेत. मेडिकल रिपोर्टमध्ये हे समजल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली.
तक्रारदार व्यक्तीने 11 डिसेंबर 2024 मध्ये मोठ्या धूम धडाक्यात लग्न केलं होतं. दोन्ही कुटुंबात आनंद होता. पण आता स्थिती बिघडलीय. पतीने पोलिसांना सांगितलं की, त्याची पत्नी निकाहच्या पहिल्या दिवसापासून आजारी होती. तापासह तिला अनेक समस्या होत्या. लग्नानंतर तिच्या उपचारासाठी तिला अनेक डॉक्टरांकडे घेऊन गेलो. पण त्याचा काही फायदा झाला नाही. एका प्रायवेट हॉस्पिटलमध्ये पत्नीच्या काही चाचण्या केल्या. टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर पत्नी HIV पॉझिटिव्ह असल्याच समजलं. या आजाराची आता थर्ड स्टेज आहे.
संपूर्ण कुटुंब टेन्शनमध्ये
पोलिसांनी सांगितलं की, या माणसाचा हे दुसरं लग्न आहे. पत्नीला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. एक मुलगी दीड वर्षांची आहे. ती सुद्धा मागच्या दोन महिन्यांपासून आजारी आहे. तिच्या देखभालीची जबाबदारी सुद्धा या व्यक्तीने घेतलेली. पण आता परिस्थिती अशी आहे की, तो स्वत:च घाबरलेला आहे. या प्रकरामुळे संपूर्ण कुटुंब टेन्शनमध्ये आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपांचा तपास केल्यानंतर कारवाई केली जाईल.