41 व्या जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यात

शिवाजीच्या महाविद्यालयाच्या स्काऊट, गाईड पथकांनी मारली बाजी
मोर्शी / तालुका प्रतिनिधी
शिक्षण विभाग जि. प. अमरावती व भारत स्काऊट गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच भातकुली येथे जिल्हा स्काऊट गाईड मेळावा सम्पन्न झाला यामध्ये मोर्शीच्या शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शीच्या स्काऊट गाईड पथकांचा सहभाग होता तीन दिवस चाललेल्या या मेळाव्यात विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच स्कीलो ड्रामा या प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला ,भातकुली शहरातुन काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान पथनाट्य स्काऊट विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला या मेळाव्यात स्काऊट कॅप्टन मनीष केचे , स्काऊट कॅप्टन सारंग जाणे ,गाईड कॅप्टन विजया रोकडे , वर्षा बावनकर ,साठवणे, कु पुजा मेटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
विद्यार्थ्यांनी जिल्हा स्काऊट, गाईड मेळाव्यात मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख यांनी तसेच उपमुख्याध्यापक रवींद्र जावरकर ,पर्यवेक्षक मिलिंद ढाकुलकर, उद्धवराव गिद ,शिक्षक प्रतिनिधी अशोक चौधरी ,विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले