छावा ‘ चित्रपट करमुक्त करण्यात यावा – देशमुख

‘
अकोले : आपल्या राज्यासह संपूर्ण देशात स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपणा सर्वांना परिचित आहे परंतु या चित्रपटाच्या मध्येमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य,बलिदान,युद्धकौशल्य,चारित्र्यगुण,बुद्धीचातुर्य नव्या पिढीसमोर येण्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहून त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.छत्रपती शिवाजी महाराजा नंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास संपूर्ण देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे आज भरकटलेल्या तरुणाईला या महापुरुषांच्या विचारांची आवश्यकता असल्याने हे ऐतिहासिक क्षण जतन होणे अतिशय गरजेचे आहे म्हणूनच त्यांचे स्मरण होण्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा तसेच शाळा व कॉलेज मध्ये दाखवण्याच्या सूचना करण्यात याव्या अशी विनंती सामाजिक कार्येकर्ते मातोश्री शांताई देशमुख सोशिअल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब देशमुख यांनी ईमेलद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली.