अपघात
ट्रॅक्टर ट्रॉली चे हायड्रोलीक डोक्यावर पडल्याने त्याखाली दबून युवकाचा मृत्यू.

मोहाडी पोलिसात अजून गुन्ह्याची नोंद नाही प्रकरण दडपण्यासाठी चालू आहे सारवा सारव.

मोहाडी.ता.प्र.
तालुक्यात वाळू घाटातून जास्तीत जास्त ट्रिप्स लागावी यासाठी वाळू चोरी करणाऱ्यांमध्ये चढाओढ लागली असते. आणि त्यासाठी वाहन धारक जोराने वाहन चालवतात. आणि ट्रिप लवकर खाली करून घेण्यासाठी घाई करतात. ट्रॅक्टर चा हायड्रोलीक अडकल्याने तो खाली करण्यासाठी गेलेल्या कामगाराचा चेसिस व ट्रॉली या दोघांच्या मधात दबून लोकेशच्या जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोकेशन भाकरू बुधे असे त्या मजुराचे नाव आहे.
तालुक्यातील बेटाळा हे रेती घाट डेपोच्या नावाने मकर झाले असून या घाटावर सर्व रेती चोरीचे कार्य सुरू असून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व नेते यांच्या साठ गाठीने मोठ्या प्रमाणात रेती चोरीचे कार्य सुरू आहे.
दि.16 फेब्रुवारी रोजी सकाळी नदीपत्रातून रेती चोरीचे कार्य सुरू झाले ट्रॉली क्रमांक MH.36.AG.1801
ही सुखदेव गजानन नवखरे यांच्या नावे असून ट्रॉलीस लागलेल्या ट्रॅक्टरला नंबर नाही हा ट्रॅक्टर नदीपत्रातून रेती चोरीचे कार्य करत असताना रेती जमा करणाऱ्या ठिय्यावर येऊन ट्रॉली वरती करून रेती खाली केली ट्रॉली खाली करण्यास गेले असता ट्रॉलीमध्ये बिघाड आल्याने ट्रॉली खाली आली नाही त्यामुळे मृतक लोकेश भाकरू बुधे 25 हा चालकाच्या सांगण्यावरून ट्रॉली खाली जाऊन बघत असताना बिघाड असलेले ट्रॉली अचानक खाली येऊन लोकेश याच्या डोक्यावर पडली त्यात दबून लोकेश यांचा जागीच मृत्यू झाला रेती काढण्याकरता असंख्य ट्रॅक्टर व रेती भरण्याकरिता असंख्य ट्रक उपलब्ध होते तेथील ड्रायव्हर कंडक्टर यांनी धाव घेऊन लोकेश यास बाहेर काढले त्यावेळी लोकेशन चा मृत्यू झाला होता.
Bold प्रेत नेले उपचारासाठी प्रकरण दडपण्यासाठी उठा ठेव.
लोकेश बुधे यांच्या डोक्यावर ट्रॉली पडल्याने लोकेश चा जागी मृत्यू झाला होता. सदर प्रेत घेऊ नये म्हणून प्रेत भंडारा येथे नेण्यात आले परंतु तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले रेती घाटावर चालणारा प्रत्येक काम अनधिकृत आहे.
Bold सीसीटीव्ही कॅमेरे आहेत बंद. –
रेती डेपोवर शासनाने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे रेतीची साठवणूक रेती भरण्याचे स्थळ रेती वाहतूक व वजन स्थळ या सर्वांची चित्रफिती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद होते त्यामुळे घटनाक्रम कसे झाले का झाले होण्याच्या मागचे कारण काय मृतक तिथे काय करत होता ट्रॅक्टर कुठून आला तो काय करत होता हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असेल पोलिसांनी त्याची चौकशी करणे गरजेचे आहे जर कॅमेरे बंद असतील तर कुणाच्या आशीर्वादाने बंद आहेत हा प्रश्न सुद्धा उपस्थित होणार आहे.
Bold प्रेत घाट रस्त्यावर ठेवून झाला समझोता ? .-
दि.16 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास लोकेश यांचे प्रेत स्वच्छदन करून भंडारा येथून बेटाळा येथे आले लोकेशचे प्रेत घाटाकडे जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील गेटवर ठेवून मोबदल्याची मागणी करण्यात आली समाधानकारक मोबदला मिळाल्याने लोकेशन च्या वर सायंकाळी 5 वाजता वैनगंगा नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Bold लोकेश च्या आईने फोडला टाहो.-
लोकेश व त्याला एक मोठा भाऊ एक बहीण आहे वडील वारल्यामुळे लोकेश हा आईला आसरा होता परंतु काळाने आईचा आसरा हिरावून घेतला ही माहिती आईला माहीत होताच आईने टाहो फोडला बेटाळा येथील वातावरण स्मशान शांततेत बदलून गेले होते.
लोकेशचे प्रेत भंडारा येथे नेल्याने व मोहाडी पोलिसांना कोणतीही माहिती न दिल्याने भंडारा येथे मर्ग दाखल झाले असून मोहाडी पोलिसांकडे वृत्त लिहीपर्यंत तपास आला नव्हता. सदर प्रकरण डीले कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित असून त्याचीच ही रंगीन तालीम आहे.