भजनाच्या तालावर हत्तीच्या पिलाचा नाचतांनाचा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ

महाकाय हत्ती शक्तिशाली तर आहेच पण तितकाच शांत आणि समजूतदार प्राणी आहे. सर्कस मध्ये किंवा मंदीरात गजराज विशिष्ट कामासाठी असतात. मुख्यतः दक्षिण भारतात गजराज मोठ्या प्रमाणात आढळतात. पण सध्या सोशल मीडियावर हत्तीच्या पिलाचा भजनाच्या तालावर नाचणारा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे.
इथे एका हत्तीचा सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने आता अनेकांचे मन जिंकले असून लोक आता याला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
लहान हत्तीला भजनावर नाचताना तुम्ही कधी पाहिलंय का? नाही तर हा व्हायरल व्हिडिओ तुमचे मन जिंकेल. गुरुवायूर मंदिराने तिरुचेंदूर मंदिराला एक लहान आणि गोंडस हत्ती दिला असल्याचे सांगितले जात आहे. हा छोटा हत्ती सामान्य हत्ती नसून हा एक अनोखा हत्ती आहे ज्याला गाण्यांच्या तालावर नाचण्याचा छंद आहे. नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्येही हा हत्ती भजनात गुंग होऊन आपले शरीर हलवत तालासुरात नाचताना दिसला. हे दृश्य पाहून सर्वच थक्क झाले. चिमुकल्या हत्तीचे हे नृत्य आता अनेकांची मने जिंकत आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, लोक मंदिराच्या आतून भजन गाऊ लागतात. त्यानंतर लहान हत्ती, आनंदाने, भजनाच्या तालावर एकरूप होऊन नाचू लागतो. कधी तो त्याचे छोटे पाय टॅप करतो तर कधी नाचतो आणि आपली सोंड आणि कान हलवून आनंद व्यक्त करतो. छोट्या हत्तीच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर अनेकांना मोहून टाकले आहे. हत्ती हा मुळातच एक विशाल शरीराचा पण शांत असा प्राणी आहे. हत्तीचे असे हे रूप आजवर कोणी पाहिले नाही ज्यामुळे छोट्या हत्तीला नाचताना पाहून अनेकांना आनंदाचा धक्का बसला.
चिमुकल्या हत्तीचे हे नृत्य @gargivach नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. गुरुवायूर मंदिराने तिरुचेंदूर मुरुगन मंदिराला हत्तीचे बाळ भेट म्हणून दिले. त्याला नाचायला फार आवडते’ असे यात लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओ आतापर्यंत 1 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत हत्तीच्या या अनोख्या नृत्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “तो नाचत नाहीये तर तो तणावात आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप गोड, या बाळाला इतकं छान नाचायला कोणी शिकवलं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.