निवड / नियुक्ती / सुयश

ईश्वर अशोक (बाबूसेठ) बोरा यांची जैन कॉन्फरन्स च्या राष्ट्रीय समन्वयक समिती सदस्य पदी नियुक्ती

Spread the love

 

अहमदनगर: श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय समन्वयक समिती सदस्यपदी चतुर्थ झोनसाठी ईश्वर अशोक (बाबूसेठ) बोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतभरातून पाच झोनच्या वतीने प्रत्येकी एक राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य या पदावर नियुक्त करण्यात आले असून, झोन १ ते ५ मध्ये कार्यरत राहण्यासाठी कंवरलाल जी सुर्या जैन, सुरेशकुमार जी लुणावत जैन, जयंती जी कुकडा जैन, राकेश जी जैन यांचीही निवड झाली आहे.

ही पाच सदस्यीय समिती संपूर्ण भारतभर श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी समन्वयक म्हणून काम करणार आहे. झोन स्तरावर नियुक्त उपाध्यक्ष, प्रांतीय समिती सदस्य, युवा शाखा, महिला शाखा तसेच अन्य पदाधिकाऱ्यांना दिशा देण्याचे आणि त्यांचे समन्वयन करण्याचे कार्य या समितीच्या सदस्यांकडून पार पडले जाणार आहे. तसेच, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री आणि संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत समन्वय साधत झोन पातळीवरील कार्यरत पदाधिकाऱ्यां मधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत त्यांना या समितीच्या सदस्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ईश्वर बोरा हे या समितीतील सर्वांत तरुण सदस्य असून, संपूर्ण भारतातील पाच सदस्यांमध्ये त्यांची नियुक्ती अत्यंत प्रतिष्ठेच्या या पदावर झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी फेरनिवड झाली असून आता त्यांच्या कडे ही अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष व महामंत्री यांच्या द्वारे दिल्लीतील नुकत्याच पार पडलेल्या शपथविधी प्रसंगी सोपवण्यात आली असून ईश्वर बोरा यांनी देखील सदर पदभार स्वीकारत शपथ घेतली आहे. यापूर्वीही २०२२-२४ या कालावधीत त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी समिती सदस्य या पदावर काम केले आहे. तसेच, २०१४-२०१६ या कालावधीत त्यांनी चतुर्थ झोनच्या प्रांतीय युवा शाखेचे उपाध्यक्ष म्हणूनही यशस्वी कार्यभार सांभाळला आहे.

ईश्वर बोरा हे श्री अशोक बाबूसेठ बोरा यांचे सुपुत्र असून, त्यांचे वडील १९८० पासून श्री अ. भा. श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्समध्ये कार्यरत असून त्यांनी श्रमण संघाच्या या अतिशय प्रतिष्ठित व शिखर संस्थेचे विश्वस्त, उपाध्यक्ष, युवा अध्यक्ष तसेच इतर अनेक पदावर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

ईश्वर बोरा यांच्या या प्रतिष्ठित निवडीबद्दल संपूर्ण भारतभर आणि अहिल्यानगरमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांना भावी कार्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close