क्राइम

थांबा बुरख्याच्या आत काय आहे ? हा प्रश्न आणि .

Spread the love

मुंबई / नवप्रहार ब्युरो 

            त्या चार महिला मुंबईच्या  छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर चार बुरखाधारी महिला उतरल्या. त्या महिला ग्रीन चॅनल पर्यंत जाण्याच्या अगोदर कस्टम अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. पण जश्याच त्या महिला मेटल डिटेक्टर मधून गेल्या तसेच अधिकाऱ्यांनी त्यांच्यापुढे प्रश्न टाकला. बुरख्याच्या आता काय आहे ? आणि ….

मुंबई विमानतळावरच्या या प्रकरणात डीआरआयला केनियन टोळीबद्दलची एक गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर डीआरआयने मुंबई विमानतळावर सापळा रचला. शुक्रवारी नैरोबीहून मुंबई विमानतळावर आलेल्या चार महिलांकडे पाहून डीआरआयला संशय आला. या चारही महिला बुरख्यामध्ये असल्यामुळे डीआरआयच्या टीमने त्या कस्टमच्या ग्रीन चॅनलजवळ जाईपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.

प्रश्न ऐकताच चेहऱ्याचा रंग उडाला

कस्टमच्या ग्रीन चॅनलमध्ये पोहोचल्यानंतर चारही महिला मेटल डिटेक्टरमधून गेल्या, यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. यानंतर महिला अधिकाऱ्याने बुरख्याच्या आत काय आहे? असं विचारलं, तेव्हा चारही महिलांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. उत्तर देताना या चारही महिलांनी नकारार्थी मान हलवली.

कोट्यवधींचं सोनं जप्त

यानंतर चारही महिलांना इनव्हेस्टिगेशन रूममध्ये नेण्यात आलं आणि त्यांची तपासणी सुरू झाली. या महिल्यांच्या बुरख्याच्या आत सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या सोनं जवळपास 5.185 किलो असून याची किंमत जवळपास 4.14 कोटी रुपये आहे. तपासामध्ये या चारही महिला नैरोबीच्या असल्याचं समोर आलं आहे. कस्टमने या चारही परदेशी महिलांना अटक केली असून सोनंही जप्त केलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close