तो तिचा हात पकडून गंगेत उतरला आणि डुबकी लावुन बघतो तर काय ?
कुंभमेळ्यात लहान पणी गेलेले दोन भावांची यात्रेच्या गर्दीत ताटातूट होते.मग काही वर्षानंतर ते कुठल्या तरी घटनेत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात. मग त्यांच्यात मारामारी होते त्यावेळी यापैकी एकाच्या शरीरावर असलेली खून दुसरा ओळखतो. आणि मग ते मिळून शत्रूचा बदला घेतात. अश्या घटना चित्रपटात पाहायला मिळतात. पण या कुंभमेळ्यात अजब घटना घडली आहे. यावेळी दोन भाऊ, भाऊ बहीण नाही तर नवरा बायको बिछडलें आहेत.
महाकुंभात यावेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठी तयारी करण्यात आली होती. हरवला-सापडला सारखे केंद्रही कुंभमेळ्यात तयार करण्यात आले होते. म्हणजे कुटुंबीयांना आपल्या नातेवाईकांना भेटणं सोपं व्हावं हा त्याचा हेतू होता.
तरीही एका व्यक्तीची त्याच्या पत्नीशी ताटातूट झाल्याचं आढळून आलं. हा माणूस त्याची पत्नी शोधण्यासाठी संपूर्ण कुंभमेळ्यात एकटाच वेड्यासारखा फिरत होता. पण त्याला काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे त्याच्या डोळ्याच्या कडाही रडून रडून सुजल्या होत्या.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. या ठिकाणी देशविदेशातील लाखो भक्त आले आहेत. गर्दी वाढली तरी लोकांची आस्था काही कमी झालेली नाही. रोजच लाखो लोक त्रिवेणी संगमावर येत असून डुबकी घेत आहेत. 13 जानेवारीपासून आतापर्यंत 40 कोटी भक्तांनी गंगेत स्नान केलं आहे. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यानंतरही लोकांची गर्दी काही कमी झालेली नाही. लोकांचा ओढा येतच आहे. भक्ती आणि श्रद्धेपुढे सर्व गोष्टी फिक्या ठरल्या आहेत.
हात सुटला अन्…
या ठिकाणी एक जोडपंही आलं होतं. गंगेत स्नान करून साधूसंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे लोक आले होते. आगऱ्यातील बाह परिसरातील ते राहणारे आहेत. दोघांनीही गंगेत डुबकी घेतली. पण त्यानंतर गर्दीत त्याचा पत्नीच्या हातातील हात सुटला. आणि काही क्षणात त्याची बायको अशा पद्धतीने बेपत्ता झाली की त्याला सापडलीच नाही. आता हा व्यक्ती त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याच्या पत्नीला शोधत आहे. पण तिची कोणतीच खबर त्यांना मिळाली नाही.
डोळे सूजले, पण…
चित्राहाटच्या सूरजनगरमधील कुर्ती सिंह भदौरिया आणि चंदावती हे दोघे नवरा बायको बुधवारी सकाळी गंगेत स्नान करण्यासाठी गेले. दोघांनीही एकमेकांचा हात पकडून गंगेत डुबकी घेतली. डुबकी घेतल्यानंतर बाहर निघाले तेव्हा गर्दीत दोघांचा हात हातातून सुटला होता. त्यामुळे चंदावती त्याच्यापासून दूर गेली. त्याने चंदावतीला शोधण्याचा अथक प्रयत्न केला. पण ती काही त्याला भेटली नाही.
अचानक चंदावती गायब झाल्याने त्याच्यावर जणू आभाळच कोसळलं. शेकडो लोकांना त्याने चंदावतीबाबत विचारलं. पण कोणालाच काही माहीत नव्हतं. पाण्यातही शोध घेतला पण चंदावती काही सापडली नाही. त्यामुळे त्याचा जीव थकला. रडून रडून डोळे सूजले पण त्याला चंदावती काही सापडली नाही. आजही त्याने चंदावतीला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण ती त्याला सापडलीच नाहीये.