बाप तो बापच …! असे वाचवले त्याने मुलाचे प्राण

गरुड हा शक्तिशाली पक्षी आहे. तो मोठ्या मोठ्या प्राण्यांना आपल्या पंज्यात पकडून उचलून घेऊन जातो. सोशल मीडियावर या पक्षाच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यात तो बिबट्या सारख्या हिंस्त्र प्राण्याला देखील आपल्या पंज्यात उचलून नेताना दिसतो. तर काही व्हिडिओत तो हरण, पर्वती मेंढ्या यांना देखील उचलून नेताना पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात गरुड खेळत असलेल्या एका मुलाला आपल्या पंज्यात उचलून नेण्यासाठी त्याच्याकडे झेपावतो. दरम्यान वडिलांचे गरुडा कडे लक्ष जाते. आणि तो धावत जाऊन आपल्या मुलाला कवेत घेतो.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यात गरुड कोणत्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा नाही तर चक्क एका चिमुकल्याचा शिकार करताना दिसून आला. व्हिडिओतील दृश्ये आता अनेकांना थक्क करत आहेत. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
जसे सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते तसेच गरुड हा अवकाशातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. त्याच्या वेगापुढे अनेकांची ताकद कमी पडते. आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि वेगाने तो जमिनीवरील अनेक प्राण्यांची शिकार करतो. सध्या त्याच्या असाच एका शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये गरुड एका चिमुकल्यावर निशाणा साधताना दिसून येतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकेल. व्हिडिओत तुम्ही जर नीट पाहिले तर यात दिसते की, एक चिमुकला तलावाच्या काठावर उभे आहे, यावेळी अचानक आकाशात उडणाऱ्या गरुडाने त्याला आपले भक्ष्य बनवले.
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, गरुड कधी मुलाजवळ पोहोचतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात अचानक मुलाचे वडील आत येतात. वडिलांनी ताबडतोब धावत जाऊन मुलाला गरुडाच्या पकडीतून काढले. हे दृश्य पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की वडील थोडा वेळ थांबले असते तर गरुडाने मुलाला उचलून नेले असते. यावेळी वडिलांच्या प्रसंगावधाने मुलाचे प्राण वाचवले. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
गरुडाचा हा थरारक व्हिडिओ @shakeelahmad2268 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाइक्स दिले आहेत तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत या प्रकारावर आपले मतदेखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मस्त एडीटिंग” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शक्तीशाली गरुड काहीही करू शकतो”.